Lokmat Money > बिझनेस न्यूज > कलादालनच्या संगीत स्पर्धेत नवोदित गायकांची बाजी

कलादालनच्या संगीत स्पर्धेत नवोदित गायकांची बाजी

फोटो-रॅप

By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:39+5:302015-07-10T23:13:39+5:30

फोटो-रॅप

Novel singers win art at the Kaladlan music competition | कलादालनच्या संगीत स्पर्धेत नवोदित गायकांची बाजी

कलादालनच्या संगीत स्पर्धेत नवोदित गायकांची बाजी

टो-रॅप
- राहुल हुमणे, सेबी जेम्स आणि श्रद्धा यादव विजयी : संगीत भूषण पुरस्कार प्रदान समारंभ
नागपूर : विविध वयोगटात आयोजित करण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेत नवोदित आणि हौशी गायकांनी एकापेक्षा एक सरस गीतांचे तयारीने सादरीकरण करून उपस्थितांना आनंद दिला. प्रत्येक गायकाने गीतावर घेतलेली मेहनत आणि सादरीकरणाची तयारी यावेळी दिसून आली. यानिमित्ताने अनेक चांगले गायक रसिकांच्या समोर आले आणि त्यांना संधी मिळाली. ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी यावेळी आपल्या गानकौशल्याने रसिकांची दाद मिळविली.
ही स्पर्धा कलादालन फाऊंडेशन, हेल्पिंग पीपल, रेवती कन्स्ट्रक्शन, आदित्य-अनघा समूह आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी संगीत भूषण गीतगायन स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली होती. अंतिम स्पर्धा सायंटिफिक सभागृहात ही अंतिम स्पर्धा पार पडली. वय वर्षे ८ ते १५, १६ ते ३० आणि ३० च्या पुढील वयोगटासाठी ही स्पर्धा होती. स्पर्धेचे परीक्षण संगीतकार शैलेश दाणी, ढोबळे गुरुजी आणि स्मिता जोशी यांनी केले. लहान वयोगटात सेबी जेम्स प्रथम, ऐश्वर्या नागराजन द्वितीय आणि आकांक्षा चारभाई हिला तृतीय क्रमांक देण्यात आला. १५ ते ३० वयोगटात प्रथम श्रद्धा यादव, द्वितीय रसिका काळमेळकर आणि तृतीय स्थानी श्रेया खराबे यांची निवड करण्यात आली. ३० च्या पुढील वयोगटात प्रथम राहुल हुमणे, द्वितीय माधवी पळसोटकर आणि शर्मिष्ठा झा यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेचा प्रारंभ पं. प्रभाकरराव धाकडे, दीपक निलावार, एम. ए. कादर, डॉ. सुधीर कुणावार, रमेश बोरकुटे, पद्मजा सिन्हा, सागर मधुमटके, मनीष गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. माधवी पांडे यांनी स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका प्रास्ताविकातून मांडली. याप्रसंगी प्राथमिक फेरीतील परीक्षक विलास डांगे, प्रसन्न जोशी, अश्विनी लुले, पद्मजा सिन्हा, मंजिरी वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. संगीत संयोजन परिमल जोशी आणि पंकज यादव यांचे होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुणाल गडेकर, मकरंद भालेराव, स्वप्निल बावणे, अविनाश बावणे, नंदू अंधारे, वसंतराव घरोटे, पराग जोशी, सुषमा भांडारकर, चैत्राली भांडारकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन मो. सलिम, ध्वनिसंयोजन अनिल कांबळे तर मंचसजावट राजेश अमीन यांची होती.

Web Title: Novel singers win art at the Kaladlan music competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.