Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोव्हेंबरमध्ये सहा टक्के वृद्धीने १ लाख कोटींवर जीएसटी वसुली

नोव्हेंबरमध्ये सहा टक्के वृद्धीने १ लाख कोटींवर जीएसटी वसुली

मागच्या वर्षी नोव्हेंबर २०१८ मध्ये ९७,६३७ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 04:27 AM2019-12-02T04:27:58+5:302019-12-02T04:30:07+5:30

मागच्या वर्षी नोव्हेंबर २०१८ मध्ये ९७,६३७ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता.

In November, GST was estimated at 1 lakh crore, a six percent increase | नोव्हेंबरमध्ये सहा टक्के वृद्धीने १ लाख कोटींवर जीएसटी वसुली

नोव्हेंबरमध्ये सहा टक्के वृद्धीने १ लाख कोटींवर जीएसटी वसुली

नवी दिल्ली : तीन महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये जीएसटी (वस्तू-सेवाकर) वसुलीचा आकडा एक लाख कोटीच्या वर गेला आहे. सणासुदीमुळे वाढलेल्या मागणीच्या जोरावर मागील वर्षातील याच अवधीच्या तुलनेत जीएसटी वसुली ६ टक्क्यांनी वाढली असून, १.०३ लाख कोटीचा जीएसटी वसुली झाली आहे.
मागच्या वर्षी नोव्हेंबर २०१८ मध्ये ९७,६३७ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता. दोन महिने जीएसटी वसुलीत घट झाल्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये मात्र जीएसटी वसुलीत सहा टक्के वाढ झाली. जीएसटी वसुलीत झालेली वाढ बघता खप-उपभोगात सुधारणा होत असून पालनही चांगले होत आहे. हस्तक्षेपाशिवाय वसुली करण्याच्या कर वसुलीच्या पद्धतीचे पालन करण्यात सुधारणा होण्यास मदत झाली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
देशांतर्गत व्यवहारातून झालेल्या जीएसटी वसुलीत १२ टक्के वाढ झाली असून, ही या वर्षातील सर्वात मोठी मासिक वृद्धी होय. जीएसटी प्रणाली सुरू केल्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वाधिक कर वसुली होण्याची ती तिसरी वेळ आहे. या आधी या वर्षात मार्च आणि एप्रिलमध्ये यापेक्षा जास्त जीएसटी वसुली झाली होती. नियमित समायोजनेतहत एकीकृत जीएसटीतून केंद्रीय जीएसटीत २५,१५० कोटी आणि राज्य जीएसटीत १७,४३१ कोटी रुपयांचे समायोजन करण्यात आले.
डिलॉयट इंडियाचे भागीदार एम. एस. मणी यांनी सांगितले की, काही महिने वसुली सुस्तावल्यानंतर नोव्हेंबरच्या सणासुदीच्या हंगामात जीएसटी वसुलीचा आकडा एक लाख कोटी रुपयांवर गेला. त्यामुळे बाजाराप्रती धारणा मजबूत झाली आहे.

उपकरातून ७,७२७ कोटी रुपये प्राप्त
नोव्हेंबर २०१९ मधील १,०३,४९२ कोटींच्या जीएसटी वसुलीत केंद्रीय जीएसटीतून १९,५९२ कोटी, राज्य जीएसटीतून २७,१४४ कोटी, एकीकृत जीएसटीतून ४९,०२८ कोटी ( यात २०,९४८ कोटींच्या आयात शुल्काचा समावेश आहे) आणि उपकरातून प्राप्त झालेल्या ७,७२७ कोटींचा समावेश आहे.

Web Title: In November, GST was estimated at 1 lakh crore, a six percent increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी