Join us

Go First Right to Fly Sale: विमान प्रवास अवघ्या ९२६ रुपयांत! Go First Airlines ची खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 5:35 PM

Go First Right to Fly Sale: हवाई वाहतूक कंपन्या आपली तिकीट विक्री आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी वेळोवेळी प्रवाशांसाठी काही खास ऑफर घेऊन येत असतात.

Go First Right to Fly Sale: हवाई वाहतूक कंपन्या आपली तिकीट विक्री आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी वेळोवेळी प्रवाशांसाठी काही खास ऑफर घेऊन येत असतात. विशेषत: सणासुदीच्या काळात ऑफर्सचा पाऊस पडतो. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे विमान प्रवाशांना अनेकदा विमान प्रवास रद्द होण्याच्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. आजही अनेक विमान प्रवास रद्द होण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. यातच आपले ग्राहक टिकून राहावेत यासाठी अनेक एअरलाइन्स कंपन्या काही खास ऑफर जाहीर करत आहेत. गो फर्स्ट एअरलाइन्स कंपनीनंही अशीच एक खास ऑफर आणली आहे. 

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गो फर्स्ट एअरलाइन्सनं प्रवाशांना अवघ्या ९२६ रुपयांत विमान प्रवासाची ऑफर आणली आहे. कंपनीनं Right To Fly Sale नावानं एक ऑफर आणली आहे. 

गो फर्स्टची खास ऑफरएअरलाइन्स कंपनी गो फर्स्टनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नव्या ऑफरची घोषणा केली आहे. "गो फर्स्ट राइट टू फ्लाय सेलची घोषणा झाली आहे. या ऑफर अंतर्गत विमान प्रवासाचं तिकीट अवघ्या ९२६ रुपयांपासून आहे. ही ऑफर देशांतर्गत उड्डाणांसाठी असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणत्याही पद्धतीची सूट यात नाही", असं ट्विट गो फर्स्ट एअरलाइन्सनं केलं आहे. तसंच ऑफरची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी एक लिंक देखील दिली आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफरगो फर्स्टच्या Right to Fly Sale ऑफर अंतर्गत बुकिंग फक्त २२ जानेवारी ते २७ जानेवारी २०२२ याच कालावधीत करता येणार आहे. म्हणजे केवळ याच कालावधीत बुकिंग केलेल्या तिकीटांना ऑफरचा लाभ घेता येणार आहे. तर प्रवासाचा कालावधी १२ फेब्रुवारी ते ३ डिसेंबर २०२२ इतका असणार आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही तिकीट बुकिंग केल्यास तुम्हाला प्रवासाच्या तीन दिवस आधीपर्यंत कोणतीही चेंज फी न भरता तुमचं फ्लाइट तिकीट रिशेड्युल देखील करता येणार आहे. पण तुम्ही तिकीट रद्द करणार असाल तर नियम आणि अटी लागू आहेत. यासाठी तुम्हाला स्टँडर्ड कॅन्सिलेशन चार्ज द्यावा लागणार आहे. 

टॅग्स :विमानव्यवसायप्रजासत्ताक दिन