Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता ब्रिटनच्या कंपनीवर अंबानींची नजर, टाटासह वाढणार दिग्गजांचं टेन्शन!

आता ब्रिटनच्या कंपनीवर अंबानींची नजर, टाटासह वाढणार दिग्गजांचं टेन्शन!

जर ही डील प्रत्यक्षात आली तर भारतामध्ये टाटाच्या ज्युडिओ, लँडमार्क समूहाच्या मालकीच्या मॅक्स आणि शॉपर्स स्टॉपच्या इनट्यून समोर एक नवे आव्हान राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:51 PM2024-02-29T21:51:33+5:302024-02-29T21:52:44+5:30

जर ही डील प्रत्यक्षात आली तर भारतामध्ये टाटाच्या ज्युडिओ, लँडमार्क समूहाच्या मालकीच्या मॅक्स आणि शॉपर्स स्टॉपच्या इनट्यून समोर एक नवे आव्हान राहील.

Now Ambani's eyes on the British retailer primark, the tension of the veterans will increase with Tata | आता ब्रिटनच्या कंपनीवर अंबानींची नजर, टाटासह वाढणार दिग्गजांचं टेन्शन!

आता ब्रिटनच्या कंपनीवर अंबानींची नजर, टाटासह वाढणार दिग्गजांचं टेन्शन!

अमेरिकेतील वॉल्ट डिस्नेसोबतच्या डीलनंतर आता रिलायन्स आणखी एका मोठ्या अधिग्रहणाच्या तयारीत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज ब्रिटीश रिटेलर प्राइमार्कसोबत (Primark) चर्चा करत आहे. या माध्यमाने रिलायन्स भारतीय रिटेल मार्केटमध्ये आपला दबदबा वाढविण्याचा प्रयत्न करेल. जर ही डील प्रत्यक्षात आली तर भारतामध्ये टाटाच्या ज्युडिओ, लँडमार्क समूहाच्या मालकीच्या मॅक्स आणि शॉपर्स स्टॉपच्या इनट्यून समोर एक नवे आव्हान राहील. महत्वाचे म्हणजे, हे सर्व फॅशनशी संबंधित वस्तू आणि कपडे आदी रिटेल मार्केटमध्ये स्वस्त दरात उपलब्ध करून देतात. 

55 वर्ष जुनी आहे कंपनी -
ब्रिटेनमधील दिग्गज रिटेल कंपनी प्राइमार्कची मालकी असोसिएटेड ब्रिटिश फूड्स कडे आहे. 55 वर्ष जुनी असलेली ही कंपनी लंडनच्या स्टॉक एक्सचेन्जमध्ये लिस्टेड आहे आणि जागतीक पातळीवर हिचे 400 हून अधिक स्टोअर्स आहेत.  इकॉनॉमिक्स टाइम्सच्या एका वृत्तानुसार, गेल्या काही वर्षापासून भारतीय बाजारावरही कंपनीची नजर असून जॉइंट व्हेंचर अथवा लायसन्सिंग रूटच्या माध्यमाने रिलायन्स सोबत डील करू शकते. महत्वाचे म्हणजे, चीनमध्ये प्राइमार्कचा अधिक दबदबा आहे. यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

मॉलमध्ये स्टोर्स नसतील - 
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतामध्ये कंपनीचे अधिकांश स्टोअर्स हाय स्ट्रीटवर असण्याची शक्यता आहे. जे ग्लोबल रिटेल सेलर्सपेक्षा वेगळे आहेत. ग्लोबल रिटेल सेलर्स साधारणपणे मॉलला प्राधान्य देतात. याचाच अर्थ असा की, जर रिलायन्स आणि प्राइमार्क यांच्यात डील झाल्यास स्टोअर्स मॉल्स ऐवजी हाय स्ट्रीटवर असण्याची शक्यता आहे. 

Web Title: Now Ambani's eyes on the British retailer primark, the tension of the veterans will increase with Tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.