नवी दिल्ली - रेल्वे प्रवासासाठी काढलेले तिकीट हे अहस्तांतरणीय असते. मात्र आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना खूशखबर दिली आहे. आता तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट तुम्हाला कुठल्याही अन्य प्रवाशाला ट्रान्सफर करता येणार आहे. त्यासाठी रेल्वेने काही नियमांमध्ये बदल केला आहे. (Indian Railway ) या नियमांमध्ये बदल होण्यापूर्वी जर तुमच्या कन्फर्म तिकिटावर कुणी अन्य व्यक्ती प्रवास करताना आढळली तर त्याला गुन्हा मानला जात असे. सोप्या भाषेत सांगायचे तर तिकीट बुक केल्यानंतर काही कारणाने तुम्हाला प्रवास करणे शक्य झाले नाही तर तुम्हाला कन्फर्म तिकीट कॅन्सल करावे लागे. मात्र आता तसे करावे लागणार नाही. (Now anyone else can travel on your confirmed train ticket, find out how)
तिकीट कॅन्सल केल्यावर रेल्वे प्रवाशांना अनेकदा आर्थिक नुकसानीचाही सामना करावा लागत असे. आता रेल्वेने याच नियमात बदल केला आहे. इंडियन रेल्वेने आरक्षित तिकिटांवर प्रवाशांना खास प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याअंतर्गत जे लोक कन्फर्म तिकिटावर प्रवास करू इच्छित नाहीत त्यांना त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करता येणार आहे. तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला एक अॅप्लिकेशन स्टेशन मास्तरांना द्यावे लागेल. या प्रक्रियेला पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला तुमचे कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करू शकाल.
रेल्वे प्रवासी आपले कन्फर्म तिकीट केवळ आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी यांच्या नावेच ट्रान्सफर करू शकतील. तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट कुठल्याही मित्राच्या नावे ट्रान्सफर करू शकणार नाही. वैयक्तिकपणे तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन हे तिकीट ट्रान्सफर करू शकता. किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.