Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता लसीकरण झालेल्या प्रवाशांवर ऑफर्सचा वर्षाव

आता लसीकरण झालेल्या प्रवाशांवर ऑफर्सचा वर्षाव

विमान प्रवाशांची तसेच हाॅटेल बुकिंगची संख्या वाढत आहे. त्यात आता ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट्स आणि विमान कंपन्यांकडून संपूर्ण लसीकरण झालेल्यांना माेठी सवलत देत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:50 AM2021-06-29T09:50:11+5:302021-06-29T09:50:36+5:30

विमान प्रवाशांची तसेच हाॅटेल बुकिंगची संख्या वाढत आहे. त्यात आता ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट्स आणि विमान कंपन्यांकडून संपूर्ण लसीकरण झालेल्यांना माेठी सवलत देत आहेत

Now a barrage of offers on vaccinated passengers | आता लसीकरण झालेल्या प्रवाशांवर ऑफर्सचा वर्षाव

आता लसीकरण झालेल्या प्रवाशांवर ऑफर्सचा वर्षाव

नवी दिल्ली : तुम्ही काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेतले असतील आणि प्रवासाच्या विचारात असाल तर चांगली बातमी आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना विमान तिकिटे, हाॅटेल बुकिंगवर ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्यांकडून सवलत देण्यात येत आहे. काेराेनामुळे आदरातिथ्य आणि प्रवासी विमान वाहतूक क्षेत्राला माेठा फटका बसला हाेता. मात्र, आता हे क्षेत्र सावरायला सुरुवात झाली आहे.

विमान प्रवाशांची तसेच हाॅटेल बुकिंगची संख्या वाढत आहे. त्यात आता ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट्स आणि विमान कंपन्यांकडून संपूर्ण लसीकरण झालेल्यांना माेठी सवलत देत आहेत. देशात सध्या माेठी लसीकरण माेहीम राबविण्यात येत आहे. 

n‘मेक माय ट्रीप’ सारख्या कंपन्या ऑनलाईन व्यासपीठावरून लसीकरणासाठी स्लाॅट्स बुकची साेय उपलब्ध करुन देत आहेत. अशाच प्रकारची याेजना ‘ईजमायट्रीप’तर्फे सादर करण्यात आली आहे. 
n‘इंडिगाे’तर्फे विमान तिकिटांवर काेराेना प्रतिंबधक लसीचा एक डाेस घेणाऱ्यांना १० टक्के सवलत देण्यात येत आहे. 

Web Title: Now a barrage of offers on vaccinated passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.