Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO : आता बिझनेस करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचा लाभ, EPFO तयार करतेय योजना

EPFO : आता बिझनेस करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचा लाभ, EPFO तयार करतेय योजना

भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचारी आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी योजना आखत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 04:30 PM2022-09-03T16:30:16+5:302022-09-03T16:30:48+5:30

भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचारी आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी योजना आखत आहे.

Now business people will also get pension benefits EPFO is preparing a scheme know details | EPFO : आता बिझनेस करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचा लाभ, EPFO तयार करतेय योजना

EPFO : आता बिझनेस करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचा लाभ, EPFO तयार करतेय योजना

भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचारी आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी योजना आखत आहे. ज्यांना याचा लाभ घेता येत नाही त्यांच्या पर्यंत पोहोचण्याची EPFO ची इच्छा आहे. अधिकाधिक लोक ईपीएफओच्या योजनांमध्ये सामील होऊ शकतात. या दिशेने पाऊल टाकत EPFO ने रिटायरमेंट स्कीममझ्ये मिळणाऱ्या पैशांचं लिमिट वाढवण्यावर विचार करत आहे.

सध्या, ईपीएफओच्या विद्यमान नियमांनुसार, ज्या कर्मचाऱ्यांचा पगार १५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपन्यांमध्ये २० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत ते ईपीएफओच्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. ईपीएफओ हे नियम बदलण्याचा विचार करत आहे, त्यासाठी संबंधित विभागांशी, भागधारकांशी चर्चा सुरू आहे. सध्या ईपीएफओचे ५५ कोटींहून अधिक सदस्य आहेत.

व्यावसायिकही होऊ शकतात सामील
ईपीएफओ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा, १९५२ मध्ये बदल करावे लागतील. यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या आणि वेतनावरील मर्यादा हटवावी लागणार आहे. असे झाल्यानंतर अनेकांना याचा लाभ घेता येईल.

१८ लाख नवे सदस्य
भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जून २०२२ मध्ये १८.३६ लाख नवीन सदस्य जोडले. गेल्या वर्षी याच महिन्यात EPFO ​​ने १२. ८३ लाख नवीन सदस्य जोडले होते. अशा परिस्थितीत, जून २०२२ मध्ये, EPFO ​​ने गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के अधिक सदस्य जोडले आहेत. कामगार मंत्रालयाने शनिवारी २० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये ही माहिती दिली.

Web Title: Now business people will also get pension benefits EPFO is preparing a scheme know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.