मुंबई - गेल्या काही काळात विविध क्षेत्रात महागाई वाढत असताना आता एटीएममधून रोख रक्कम काढणेही महागण्याची शक्यता आहे. ग्राहकाने एटीएममधून निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास बँका अतिरिक्त शुक्ल आकारू शकतात. (ATM cash withdrawal) भारतीय रिझर्व्ह बँकेने हल्लीच बँकांना ऑटोमेटेड टेलर मशीनवरील चार्ज वाढवून २१ रुपये प्रति ट्रांझॅक्शन करण्याची परवानगी दिली आहे. हे संशोधित दर १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. (Now cash withdrawals will be more expensive, ATM cash withdrawal charges, debit and credit card charges will increase.)
ग्राहक आपल्या बँकांच्या एटीएममधून दर महिन्याला पाच फ्री ट्रांझॅक्शन करू शकतात. यामध्ये वित्तीय आणि गैर-वित्तीय ट्रॅझॅक्शन अशा दोन्ही प्रकारच्या ट्रांझॅक्शनचा समावेश आहे. यापेक्षा अधिक ट्रांझॅक्शन झाल्यास प्रत्येक एटीएम ट्रांझॅक्शनसाठी २० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. रोख रक्कम काढण्यासाठी दुसऱ्या बँकांच्या एटीएमचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना मेट्रो सिटीमध्ये ३ आणि नॉन मेट्रोसिटीमध्ये पाच फ्री एटीएम ट्रांझॅक्शन करण्याची परवानगी आहे.
२०१९ च्या जून महिन्यामध्य आरबीआयने एटीएम ट्रांझॅक्शनच्या इंटरचेंज स्ट्रक्चरवर विशेष लक्ष देण्याबरोबरच एटीएम चार्जेसचे परीक्षण करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. आरबीआयने एटीएम ट्रांझॅक्शनच्या इंटरचेंज फी प्रत्येक व्यावसायित ट्रान्झॅक्शनसाठी १५ रुपयांवरून वाढवून १७ रुपये एवठी केली आहे. तर नॉन फायनान्शियल ट्रांझॅक्शनसाठीची फी ५ रुपयांवरून वाढवून ६ रुपये केली आहे. नवे दर १ ऑगस्ट २०२१ पासून लागू होणार आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार इंटरचेंज फी बँकेद्वारे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डमधून पेमेंट प्रोसेस करणाऱ्या व्यापाऱ्याकडून घेण्यात येणारे शुल्क आहे.
दरम्यान, एसबीआयनेही जुलै महिन्याच्या सुरुवातीला आपल्या एटीएम आणि बँक शाखांमधून कॅश काढण्यासाठी लागणाऱ्या सेवा शुल्कामध्ये बदक केला आहे. एसबीआयने बीएबीडी खातेधारकांसाठी नवे नियम लागू केले आहेत.एसबीआयच्या म्हणण्यानुसार बीएसबीडी आकाऊंट असलेले ग्राहक ब्रँच आणि एटीएममधून आता केवळ मर्यादित म्हणजेच चार वेळाच कुठल्याही शुल्काविना पैसे काढू शकतील. यानंतर जर कुठला ग्राहक एटीएम किंवा ब्रँचच्या माध्यमातून पैसे काढणार असेत तर त्याला सेवा शुल्क म्हणून प्रत्येक ट्रांझॅक्शनसाठी १५ रुपये आणि जीएसटीचा भरणा करावा लागेल. एसबीआयशिवाय कुठल्याही इतर एटीएममधून पैसे काढले तरी हा नियम लागू होईल.