Join us

Train Running Status : आता मोबाईलवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस तपासा, अपडेट लवकर मिळतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 5:05 PM

Train Running Status : दररोज लाखो लोक रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. रेल्वेने लांबचा प्रवास करणेही सोपे आहे. आता तुम्ही तुमच्या फोनवरून कोणत्याही ट्रेनची धावण्याची स्थिती सहज तपासू शकता

नवी दिल्ली : ट्रेनमध्ये प्रवास करताना आणि ट्रेनची वाट पाहण्यासाठी भारतीय रेल्वे तुम्हाला चांगल्या सुविधा देते, तसेच नवनवीन प्रयत्न करत राहते. ज्याच्या मदतीने तुम्ही रेल्वेचा प्रवास सहज पूर्ण करू शकता आणि तुमच्या निश्चित ठिकाणी पोहोचू शकता. दरम्यान, रेल्वे मार्गाचे नेटवर्क देशातील सर्वात मोठे मानले जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. रेल्वेने लांबचा प्रवास करणेही सोपे आहे. आता तुम्ही तुमच्या फोनवरून कोणत्याही ट्रेनची धावण्याची स्थिती सहज तपासू शकता

ट्रेन धावण्याची स्थिती (Train Running Status) आता मोबाईलद्वारेही सहज तपासता येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलची गरज आहे. लोक त्यांच्या मोबाईलद्वारे ट्रेनची धावण्याची स्थिती (Running Status) सहज तपासू शकतात. आतापर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाइन वेबसाइटवर जावे लागत होते, ज्यामुळे ट्रेनच्या धावत्या मार्गाची स्थिती तपासण्याची सुविधा मिळते. 

अशा परिस्थितीत, प्रवासी ट्रेनच्या धावण्याच्या स्थितीची तपासणी करून आपली वेळ निर्धारित करतात. भारतीय रेल्वे गाड्यांची लाईव्ह ट्रेन स्टेटस जाणून घेणे, म्हणजे कोणत्याही ट्रेनचे सध्याचे लोकेशन आणि तिचे रिअल टाइम, विलंबाची स्थिती कळू शकते. यामध्ये येणाऱ्या गाडीच्या थांब्यावर येण्याची अंदाजे वेळ कळते. ट्रेनच्या थांब्याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

असे चेक करा स्टेटस...- सर्वात आधी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वेबसाइटवर जा.- तुम्हाला येथे ट्रेन नंबर आणि नाव टाकण्याचा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये ट्रेन नंबर आणि नाव टाका.- यानंतर तुमचे स्टेशन आणि तारीख निवडा.- आता तुम्ही निवडलेल्या स्टेशनवर ट्रेन कधी येईल आणि तिथून कधी जाईल ते पहा.- त्या स्टेशनवर ट्रेन किती वेळात येणार आहे, ही माहिती मिळणार आहे.- कुठल्या स्टेशनवरून ट्रेन सुटली, पुढचं स्टेशन कोणतं, ही माहिती मिळणार आहे.- यामध्ये Full Running ऑप्शनमधून ट्रेनच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या स्टेशनपर्यंतची माहिती उपलब्ध होईल.

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वेमोबाइल