Join us  

आता २८ दिवसांऐवजी ३१ दिवसांनी करा मोबाइल रिचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:44 AM

ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज कराल त्याच तारखेला पुढील महिन्यात तुमची रिचार्जची तारीख येईल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनी जिओने ग्राहकांसाठी ३१ दिवसांच्या नवीन प्लॅनची घोषणा केली आहे. कंपनीने कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन सादर केला असून, या प्लॅनची किंमत २५९ रुपये ठेवण्यात आली आहे. यात अमर्याद डेटा आणि फोनवर बोलता येणार आहे. 

ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज कराल त्याच तारखेला पुढील महिन्यात तुमची रिचार्जची तारीख येईल. तुम्ही २९ मार्चला रिचार्ज केला तर २८ एप्रिल रोजी तुम्हाला रिचार्ज करावा लागेल. त्यामुळे कधी तुमच्या रिचार्जची वैधता ३१ दिवस, कधी ३० दिवस तर कधी २८ दिवस असेल, मात्र रिचार्जची तारीख मात्र कायम राहील. गेले कित्येक महिने दूरसंचार कंपन्या २८ दिवसांचे रिचार्ज प्लॅान सादर करत आहेत. त्यामुळे एका वर्षात १२ महिने असतानाही ग्राहकांना १३ वेळा रिचार्ज करावा लागत असे. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :जिओमोबाइल