नवी दिल्ली - प्रॉव्हिडंट फंड(PF Account) खासगी नोकरदारांसाठी बचतीचं एक माध्यम असते. कठीण काळात या फंडाचा वापर करता येतो. कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगाराचा काही हिस्सा पीएफ फंडात जमा होतो. त्या रक्कमेवर सरकारकडून दरवर्षी व्याज मिळते. चालू आर्थिक वर्षात सरकारकडून पीएफवर ८.१ टक्के व्याजदर दिले आहे. पीएफमधील रक्कम तुम्ही सहजपणे गरजेनुसार काढू शकता. EPFO सदस्य लग्नासाठीही यातील आगाऊ रक्कम काढू शकतात.
EPFO नं ट्विट करून सांगितले आहे की, सदस्य स्वत:च्या लग्नासाठी पीएफ फंडातील रक्कम आगाऊ काढू शकतात. त्याशिवाय मुलगा-मुलगी आणि बहिण-भावाच्या लग्नातही पीएफ फंडातील रक्कम काढण्याची तरतूद करण्यात आली आहे.
किती रक्कम काढू शकता?पीएफ फंडातून लग्नासाठी रक्कम काढण्याची मुभा दिली असली तरी किती पैसे तुम्ही काढू शकता? EPFO नुसार, सदस्य फंडातील व्याजसह ५० टक्के रक्कम लग्नासाठी काढू शकतात. परंतु त्यासाठी काही अटी आहेत. त्यात भविष्य निधीची ७ वर्ष पूर्ण झालेली असावीत. लग्न आणि शिक्षण यासाठी ३ पेक्षा जास्तवेळा रक्कम काढू शकणार नाहीत. तुम्ही घरी बसून पीएफ पैसा काढू शकता. ७२ तासांत हे पैसे तुम्हाला मिळतील. याची ऑनलाईन प्रोसेस खूप सुलभ आहे.
PF रक्कमतेून टीडीएस कपात सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पीएफमधून पैसे काढण्यावर टीडीएस कपात ३० टक्क्यांवरून २० टक्के करण्याची घोषणा केली आहे. ज्या खातेदारांचे पॅन कार्ड PF Account शी अपडेट नाही त्यांना याचा फायदा होईल. जर आतापर्यंत कुणाचे पॅन कार्ड EPFO रेकॉर्डमध्ये अपडेटेड नाही. तर पैसे काढल्यानंतर त्यांना ३० टक्के टीडीएस भरपाई करावी लागायची आता त्याऐवजी २० टक्के टीडीएस भरावे लागेल. जर पीएफ अकाऊंट होल्डर ५ वर्षाच्या आतमध्ये खात्यातून पैसे काढत असेल तर त्यावर टीडीएस भरावा लागतो.