देशात आयफोनच्या मॅन्यूफॅक्चरिंगला मोठा बुस्ट मिलाला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने टाटा-विस्ट्रॉन डीलला हिरवा झेंडा दाखवला आहे. टाटा इलेक्ट्ऱॉनिक्सने गेल्या वर्षी ऑक्टोबरमहिन्यात तैवानची कंपनी विस्ट्रॉनचे भारतीय ऑपरेशन्स खरेदी करण्यासाठी एक डील केली होती.
बेंगलोरजवळ विस्ट्रॉनचा एक प्लांट आहे. येथे आईफोनचे असेम्बलिंग होते. टाटा ग्रुप आणि विस्ट्रॉन यांच्यात या डीलसाठी जवळपास एक वर्षापासून चर्चा सुरू होती. विस्ट्रॉनचा हा प्लांट आयफोन-14 मॉडेलच्या प्रोडक्शनसाठी ओळखला जातो. या प्लांटमद्ये सद्या जवळपास 10,000 हून अधिक वर्कर्स काम करतात. विस्ट्रॉनचा भारतातील प्लांट आपल्या 8 उत्पादनांपैकी आयफोनचेही मॅन्यूफॅक्चरिंग करते.
विस्ट्रॉनला भारतातील आयफोन बिझनेसमधून बाहेर पडायचे आहे आणि टाटाने विकत घेण्यास उत्सुकता दर्शवली आहे. टाटाच्या अधिग्रहणानंतर, विस्ट्रॉन भारतीय बाजारातून पूर्णपणे बाहेर पडेल. कारण हा भारतातील अॅपल प्रोडक्ट्सचे प्रोडक्शन करणारा कंपनीचा एकमेव प्लांट आहे. ही कंपनी 2008 मध्ये भारतात आली होती. तेव्हा ही कंपनी अनेक डिव्हाइसेससाठी रिपेयर फॅसिलिटी प्रोव्हाइड करत होती. 2017 मध्ये कंपनीने अपले ऑपरेशन्स एक्सपांड केले आणि अॅपलसाठी आयफोनचे प्रॉडक्शन सुरू केले होते.
चीनला लागेल मिर्ची -
अॅपलने चीन-अमेरिका वादानंतर आपल्या जागतिक उत्पादनाच्या 25% उत्पादन भारतात हलविण्यासंदर्भात घोषणा केली होती. अॅपलचे प्रॉडक्ट्स असेंम्बल करणाऱ्या तैवानच्या तीन कंपन्यांपैकी केवळ विस्ट्रॉनच भारतीय बाजारातून बाहेर पडत आहे. फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनने भारतातील आपल्या उत्पादनांची संख्या वाढवली आहे. एवढेच नाही तर, भारत सरकार या कंपन्यांना अपली उत्पादने आणि रोजगार वाढविण्यासाठी इन्सेंटिव्ह देकील देत आहेत.
आंतरराष्ट्रीय कंपन्या आता चीनवरील आपले अवलंबित्व कमी करत आहेत. त्या आपल्या गुंतवणुकिसाठी भारताला पसंती देत आहेत. टाटा समूहाने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनात प्रवेश केला आहे. तामिळनाडूमधील कंपनीच्या प्लांटमध्ये आयफोनचे चेसीस बनवले जाते. आता कंपनीने चिप्स बनविण्यातही उत्सुकता दर्शवली आहे.