Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...आता जंगलाचे नियंत्रण होणार स्मार्ट फोनद्वारे

...आता जंगलाचे नियंत्रण होणार स्मार्ट फोनद्वारे

कधीकाळी अतिशय दुर्लक्षित आणि अडगळीत पडलेल्या राज्याचा वनविभाग आता मुख्य प्रवाहात येत आहे. जंगलाचे थेट नियंत्रण अत्याधुनिक प्रणालीद्वारे करता यावे

By admin | Published: October 28, 2015 09:50 PM2015-10-28T21:50:21+5:302015-10-28T21:50:21+5:30

कधीकाळी अतिशय दुर्लक्षित आणि अडगळीत पडलेल्या राज्याचा वनविभाग आता मुख्य प्रवाहात येत आहे. जंगलाचे थेट नियंत्रण अत्याधुनिक प्रणालीद्वारे करता यावे

... now the forest will be controlled by smart phones | ...आता जंगलाचे नियंत्रण होणार स्मार्ट फोनद्वारे

...आता जंगलाचे नियंत्रण होणार स्मार्ट फोनद्वारे

गणेश वासनिक, अमरावती
कधीकाळी अतिशय दुर्लक्षित आणि अडगळीत पडलेल्या राज्याचा वनविभाग आता मुख्य प्रवाहात येत आहे. जंगलाचे थेट नियंत्रण अत्याधुनिक प्रणालीद्वारे करता यावे, यासाठी स्मार्ट फोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता राज्यभरातील पाच हजार वनरक्षकांना मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे.
वनविभागाने पारंपारीक नियमावली, कामकाजाची पद्धत बदलवून काही बदल घडवून आणण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जीपीएस प्रणाली व स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे. निम्म्याहून अधिक प्रमाणात या नवीन यंत्रणेचा वापर के ला जात असल्याने जंगलाचे नियंत्रण, वनरक्षकांचे कर्तव्य, अधिकाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे सुकर झाले आहे.
जीपीएस यंत्रणेच्या वापरामुळे जंगलातील बारीकसारीक हालचाली टिपणे शक्य झाले आहे. यापूर्वी जंगलाची माहिती घेण्यासाठी वनरक्षक, वनपालांना अख्खे जंगल पिंजून काढावे लागत होते.
मात्र जंगलाची वस्तुस्थिती संकलीत करता येत नव्हती. मात्र जीपीएस यंत्रणा व स्मार्ट फोन हाती येताच वनकर्मचाऱ्यांना जंगलाची अचूक माहिती संकलित करणे सोपे झाले आहे.
वनविभागाने या बदलाची सुरुवात २०१४ मध्ये केली असून ब्रिटीशकालीन नियमावली, कायद्यांना देखील फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथील एम.आर.एस.एस.सी आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नाने आयएफआयएस हा प्रकल्प राबविण्यास प्रारंभ केला आहे. या प्रकल्पातंर्गत राज्य प्रशासकीय कायदा तयार करण्याचे धोरण हाती घेण्यात आले आहे.
या धोरणाची अंमलबजावणी म्हणून जीपीएस रिडींग घेण्याचे ठरले आहे. यात राज्यातील वनविभागाचे कार्यालय, वनरक्षकांचे मुख्यालय, तपासणी नाके, आरागिरण्यांची संख्या व त्यांची ठिकाणे, जंगलातील इंत्थभूत माहिती, वायरलेस स्टेशन, विश्रामगृहे, वॉच टॉवर, संरक्षण कॅम्प आदींचा नकाशात समावेश करण्यात आला आहे.
तसेच जंगलात शिकारी, अवैध वृक्षतोड, वनगुन्हे दाखल होताच प्रथामिक गुन्हा दाखल झाल्याबाबतची माहिती वनरक्षकांना स्मार्ट फोनद्वारे वरिष्ठांना द्यावी लागत आहे.
जंगलातील वनरक्षक, वनपालांचे लोकेशन क्षणात मिळविण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर वनविभागासाठी लाभदायक ठरत आहे.
‘‘ जीपीएस आणि स्मार्ट फोन या अद्ययावत यंत्रणेने जंगलातील माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे. क्षणात वनगुन्हे दाखल होताच प्राथामिक गुन्हा नोंदविल्याची स्मार्ट फोनद्वारे माहिती वनरक्षक अथवा वनपाल पाठवितात. जीपीएस ही प्रणाली राज्यभराशी जुळली आहे.
-नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती

Web Title: ... now the forest will be controlled by smart phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.