Join us  

आता अ‍ॅण्ड्रॉइडवर ‘जीबोर्ड’ अ‍ॅप सादर!

By admin | Published: December 22, 2016 5:18 AM

अगोदर फक्त आयओएस या आॅपरेटींग प्रणालीवर सुरू असलेले गुगलचे ‘जीबोर्ड’ हे अ‍ॅप आता अ‍ॅण्ड्रॉइडवर सादर झाले असून, गुगल प्ले स्टोरवर

अगोदर फक्त आयओएस या आॅपरेटींग प्रणालीवर सुरू असलेले गुगलचे ‘जीबोर्ड’ हे अ‍ॅप आता अ‍ॅण्ड्रॉइडवर सादर झाले असून, गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप म्हणजे गुगलचेच की-बोर्ड आहे. या अ‍ॅपला आयफोन आणि आयपॅडधारकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. तेव्हापासूनच हे अ‍ॅप अँड्रॉईडवरदेखील असावे असा यूजर्सचा मोठा आग्रह होता. या आग्रहास्तव अखेर गुगलने ‘जीबोर्ड’ अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर दाखल केले आहे. अर्थात अँड्रॉईड प्रणालीसाठी आधीच असणाऱ्या की-बोर्ड अ‍ॅपची हे जागा घेणार आहे. आधीच्या की -बोर्डमधील गतिमान व अचूक टायपिंग, व्हॉईस टायपिंग या फिचर्सशिवाय यात इनबिल्ट गुगल सर्चची सुविधा आहे. म्हणजे आपण टाईप करत असतांना गुगलवर सर्च करण्याची आवश्यकता भासल्यास आपल्याला दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. तसेच यात इमोजी, जीआयएफ आदींना पाठविणेही सुलभ होणार आहे.