Lokmat Money > बिझनेस न्यूज > WhatsApp ला टक्कर देणार आता गुगलचं Allo

WhatsApp ला टक्कर देणार आता गुगलचं Allo

गुगलने स्वतःचं इंन्स्टंट मेसेजिंग अॅप Allo लॉन्च केलं आहे. हे अॅप आजपासून अॅन्ड्रॉइड आणि iOS वापरणा-यांसाठी उपलब्ध

By admin | Published: September 21, 2016 05:37 PM2016-09-21T17:37:59+5:302016-09-21T17:37:59+5:30

गुगलने स्वतःचं इंन्स्टंट मेसेजिंग अॅप Allo लॉन्च केलं आहे. हे अॅप आजपासून अॅन्ड्रॉइड आणि iOS वापरणा-यांसाठी उपलब्ध

Now Google's Allo will compete with WhatsApp | WhatsApp ला टक्कर देणार आता गुगलचं Allo

WhatsApp ला टक्कर देणार आता गुगलचं Allo

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.21- अव्वल सर्च इंजिन अशी बिरूदावली मिरवणा-या गुगलने स्वतःचं इंन्स्टंट मेसेजिंग अॅप  Allo लॉन्च केलं आहे. हे अॅप आजपासून अॅन्ड्रॉइड आणि iOS वापरणा-यांसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. प्ले-स्टोरवर आणि अॅपलच्या अॅप स्टोरवरून हे डाउनलोड केलं जाऊ शकतं. 

येणा-या दिवसांमध्ये गुगलचं हे अॅप व्हॉट्सअॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे. कारण गुगल आपल्या सर्च इंजिनचा वापर करून इतर मेसेंजरपेक्षा याला स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.
 
स्मार्ट रिप्लाय फिचर-
याद्वारे त्वरीत रिप्लाय करणं शक्य आहे. रिप्लाय करताना तुम्हाला अनेक सजेशन मिळतील त्याला टॅप करून उत्तर देता येईल.आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे समोरच्याने तुम्हाला काय पाठवलंय हे समजेल. उदाहरण म्हणजे जर कोणी पाळीव प्रण्याचा फोटो पाठवला तर तुम्हाला 'क्यूट' हा  रिप्लाय करण्याचं सजेशन येईल.
असिस्टंट फिचर- 
गुगल असिस्टंटवर क्लिक केल्यास एक कन्वर्सेशन ओपन होईल. याद्वारे थेट गुगल चॅट बॉटसोबत चर्चा करू शकता. येथे तुम्हाला अनेक कॅटेगरी मिळतील ज्यामध्ये वेदर,गेम,स्पोर्ट्स,फन,ट्रांन्स्लेशन सारखे अनेक पर्याय आहेत. उदाहरण म्हणजे जर तुम्हाला एखाद्या खेळाचा स्कोर जाणून घ्यायचा असेल तर गेमवर क्लिक करा.  तुम्हाला त्याविषयी सर्व माहिती मिळेल.
फोटोज,इमोजी आणि स्टिकर्स-
 गुगल Allo वर चॅट करताना टेक्स आणि इमोजी हवे तितके मोठे करता येतात.फोटो सुद्धा एडिट करता येतो. याशिवाय गुगलने 25 प्रसिद्ध कलाकारांसोबत मिळून 25 कस्टम स्टिकर्स बनवले आहेत तेही तुम्ही वापरू शकता.
प्रायवसीसाठी इनकॉग्निटो मोड-
जर तुम्हाला प्रायवसी हवी असेल तर Allo मध्ये इनकॉग्निटो मोड देखील देण्यात आला आहे. 

Web Title: Now Google's Allo will compete with WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.