Join us  

आता एक ग्रॅमचाही ‘सुवर्ण बॉण्ड’

By admin | Published: July 18, 2016 5:49 AM

सरकारने सुवर्ण बॉण्ड योजनेसाठी (एसजीबी) चौथ्या टप्प्यात सोन्याचे मूल्य प्रति ग्रॅम ३,११९ रुपये ठरविले आहे.

नवी दिल्ली : सरकारने सुवर्ण बॉण्ड योजनेसाठी (एसजीबी) चौथ्या टप्प्यात सोन्याचे मूल्य प्रति ग्रॅम ३,११९ रुपये ठरविले आहे. ही योजना सोमवारी खुली होत आहे. नव्या योजनेंतर्गत आता एक ग्रॅम सोन्याचाही बॉण्ड खरेदी करता येणार आहे. सोन्याच्या किमान खरेदीची मर्यादा आता एक ग्रॅम करण्यात आली आहे. ही योजना नागरिकांसाठी आणि अन्य गुंतवणूकदारांसाठी १८ ते २२ पर्यंत खुली असेल. छोट्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास खरेदीची मर्यादा कमी करून आता एक ग्रॅम केली असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले, तर एका व्यक्तीसाठी वा संस्थेसाठी ही मर्यादा अधिकाधिक ५०० ग्रॅम असणार आहे. यापूर्वी किमान मर्यादा पाच ग्रॅम होती. सर्व प्रमुख बँक शाखा, निवडक पोस्ट कार्यालय आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया येथे हे व्यवहार होतील. >योजनेचा अवधी आठ वर्षांचा अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत सरकार २.७५ टक्के दराने वार्षिक व्याज देते. प्रत्येक सहा महिन्यांनंतर हे व्याज दिले जाते. या बॉण्डचा उपयोग कर्ज घेण्यासाठीही केला जाऊ शकतो. या योजनेचा अवधी आठ वर्षांचा आहे.तथापि, पाच, सहा आणि सात वर्षांनंतर आणि वेळेपूर्वी रक्कम काढून घेता येऊ शकते.