Join us

आता जीएसटी विवरणपत्र तिमाही भरण्याचीही मुभा; सीबीआयसीने दिली नववर्षाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 11:48 PM

९४ लाख करदात्यांना फायदा : सीबीआयसीने दिली नववर्षाची भेट

पिंपरी : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विवरणपत्र दरमहाऐवजी तिमाही भरण्यास मुभा दिली आहे. नववर्षापासून हा निर्णय लागू होणार असून, त्याचा फायदा देशातील ९४ लाख (९२ टक्के) करदात्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांचे कारकुनी काम कमी होण्यास मदत होईल. 

उलाढालीवरील जीएसटी कर दरमहा भरण्याची परवानगी आणि विवरणपत्र तिमाही भरण्याची मुभा सीबीआयसीने दिली आहे. यापूर्वी वर्षभरात बारा ३-बी विवरणपत्र भरावी लागत होती. ती संख्या आता चारपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या करदात्यांमध्ये समाधानाची भावना आहे. जवळपास ९२ टक्के करदात्यांना त्याचा फायदा होणार असल्याची माहिती सीए दिलीप सातभाई यांनी दिली. जीएसटी रिटर्न दरमहा भरण्याची सक्ती होती. मात्र, त्यासाठी व्यावसायिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.

कोणासाठी ही योजना असेल लागू गेल्या आर्थिक वर्षांत पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेलेचालू आर्थिक वर्षांतील कोणत्याही तिमाहीत पाच कोटींपेक्षा जास्त उलढाल झाल्यास पुढील तिमाहीतअपात्र - संकेतस्थळावर नोंदविलेल्या बीजकांवर आधारित रकमेवर इनपुट टॅक्स क्रेडिट मान्य होणार

टॅग्स :पिंपरी-चिंचवड