Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता एचपी कंपनीही ६ हजार कर्मचाऱ्यांना काढणार; विक्रीत घट, महागाई आणि मंदीच्या वाढत्या चिंतेचे कारण

आता एचपी कंपनीही ६ हजार कर्मचाऱ्यांना काढणार; विक्रीत घट, महागाई आणि मंदीच्या वाढत्या चिंतेचे कारण

एचपीमध्ये सध्या ५०,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. एचपीने त्यांच्या आर्थिक वर्ष २०२२ च्या पूर्ण वर्षाच्या अहवालादरम्यान कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 01:27 PM2022-11-24T13:27:34+5:302022-11-24T13:29:00+5:30

एचपीमध्ये सध्या ५०,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. एचपीने त्यांच्या आर्थिक वर्ष २०२२ च्या पूर्ण वर्षाच्या अहवालादरम्यान कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

Now HP company will also fire 6 thousand employees; Declining sales | आता एचपी कंपनीही ६ हजार कर्मचाऱ्यांना काढणार; विक्रीत घट, महागाई आणि मंदीच्या वाढत्या चिंतेचे कारण

आता एचपी कंपनीही ६ हजार कर्मचाऱ्यांना काढणार; विक्रीत घट, महागाई आणि मंदीच्या वाढत्या चिंतेचे कारण

नवी दिल्ली : फेसबुकची कंपनी मेटा, ट्विटर आणि ॲमेझॉननंतर आता आणखी एका आयटी कंपनीने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्माता हेवलेट पॅकार्ड म्हणजेच एचपीने सुमारे ६ हजार कर्मचारी काढून टाकण्याच्या तयारीत आहे. हे त्याच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे १२% आहे. एचपीमध्ये सध्या ५०,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. एचपीने त्यांच्या आर्थिक वर्ष २०२२ च्या पूर्ण वर्षाच्या अहवालादरम्यान कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

महसुलात मोठी घट -
एचपीने सांगितले की चौथ्या तिमाहीत महसूल वर्षभरात ०.८% कमी होऊन १४.८० अब्ज डॉलर झाला. संगणक विभागाचा महसूलही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. प्रिंटिंग महसूल ७%ने कमी होऊन ४.५ अब्ज डॉलर झाला. अमेरिकेतील आयटी कंपन्यांमध्ये होत असलेल्या नोकरकपातीमुळे सर्वात जास्त फटका तेथे राहणाऱ्या भारतीयांवर झाला आहे. अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर राहात असलेल्या भारतीयांना दुसरी नोकरी शोधण्यासाठी अतिशय कमी वेळ राहिला आहे. 

काय आहे नियम? 
काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी मिळवण्यात यश आले नाही, तर त्यांना व्हिसाच्या नियमांनुसार अमेरिका सोडून मायदेशी परतावे लागेल.

ग्रीन कार्डसाठी १९५ वर्षे थांबा
अमेरिकेत राहण्यासाठी त्यांना ग्रीन कार्ड मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण सध्या यावेळी जवळपास ५ लाख भारतीय यासाठी रांगेत आहेत. अमेरिकन काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, आता अर्ज करणार्या भारतीयांना ग्रीन कार्डसाठी जवळपास १९५ वर्षे वाट पहावी  लागणार आहे.

४५ हजार जणांची नोकरी गेली
अहवालानुसार, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेच्या मोठ्या आयटी कंपन्यांनी ४५ हजारपेक्षा अधिक जणांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच इतर कंपन्यांकडूनही कर्मचारी कपातीची घोषणा केली असून, भरती स्थगित केली आहे. यामध्ये अशा कंपन्यांचा समावेश आहे, ज्यांनी कोरोना काळात ॲानलाइन व्यवसाय वाढल्याने बंपर कमाई केली होती.

कपातीची कारणे -
- कोरोना महामारीच्या काळात संगणक आणि लॅपटॉपच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती. मात्र, आता विक्रीत घट झाली.
- महागाई व जागतिक बाजारातील मंदीची चिंता हे देखील नोकऱ्या कपातीचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. कारण याचा सर्वाधिक फटका आयटी कंपन्यांना बसला आहे.

आणखी कुणाच्या नोकऱ्या जाणार? कंपनी किती कर्मचारी काढणार?
२०% इंटेल, २०% स्नॅप आणि १०% शॉपिफाई कर्मचारी काढणार.

१० ग्रीन कार्ड भारतीयांना प्रत्येक वर्षी मिळतात.
७% - प्रत्येक देशांना अमेरिका प्रत्येक वर्षी रोजगारावर आधारित व्हिसा देते.
७% - ३ वर्षांत ॲमेझॉन, मेटा, लिफ्ट, सेल्सफोर्स, स्ट्राइप आणि ट्टिटरने गेल्या वर्षांत ४५ हजार जणांना एच-१ व्हिसा देण्यात आला आहे.
 

Web Title: Now HP company will also fire 6 thousand employees; Declining sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.