जगभर आणि भारतातही आघाडीच्या कंपन्यांनी अलीकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली; परंतु अमेरिकेत गुंतवणूक केलेल्या कंपन्यांनी मात्र सर्वोत्तम कामगिरी करीत आतापर्यंत ४.२५ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. या कंपन्यांनी अमेरिकेत ४० अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूकही केली आहे.
टेक्सासमध्ये माेठी गुंतवणूक, भारतीय कंपन्यांनी सर्वाधिक ९.८ अरब डॉलर्सची गुंतवणूक टेक्सास या राज्यात केली आहे. या खालोखाल जॉर्जिया, न्यूजर्सी, मॅसेच्युएटस्, केंटकी, कॅलिफोर्निया, मेरीलँड, फ्लोरिडा आणि इंडियाना या राज्यांचा क्रमांक लागतो. ८५% कंपन्या येत्या काळात अमेरिकेत आणखी गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. ८३%कंपन्या अमेरिकेत कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढवणार आहेत.
सीएसआरमध्येही मोठे योगदान
या अहवालानुसार १६३ मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत या कंपन्यांनी सीएसआरवर १८.५ कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. अमेरिकेतील विविध संशोधन आणि विकास प्रकल्पांवरही कंपन्यांनी १ अब्ज डॉलरचा निधी दिला आहे.
कोणत्या राज्यात किती नोकऱ्या?
टेक्सास २०,९०६
न्यूयॉर्क १९,१६२
न्यूजर्सी १७,७१३
वॉशिंग्टन १४,५२५
फ्लोरिडा १४,४१८
कॅलिफोर्निया १४,३३४
जॉर्जिया १३,९४५
ओहायो १२,१८८
मोंटाना ९,६०३
इलिनॉएस ८,४५४
अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजित सिंह संधू यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात या अहवालाचे प्रकाशन केले. भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.