Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता सोन्या-चांदीचा नाही तर हिरे-पन्न्याचा काळ, लवकरच 8.33 लाख कोटींचा उद्योग होणार

आता सोन्या-चांदीचा नाही तर हिरे-पन्न्याचा काळ, लवकरच 8.33 लाख कोटींचा उद्योग होणार

भारतात हिरा, पन्ना आणि इतर रंगीत रत्नांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:00 PM2023-12-01T16:00:22+5:302023-12-01T16:01:05+5:30

भारतात हिरा, पन्ना आणि इतर रंगीत रत्नांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

Now it is not the time of gold and silver but of diamonds and emeralds, there will be an industry of 8.33 lakh crores | आता सोन्या-चांदीचा नाही तर हिरे-पन्न्याचा काळ, लवकरच 8.33 लाख कोटींचा उद्योग होणार

आता सोन्या-चांदीचा नाही तर हिरे-पन्न्याचा काळ, लवकरच 8.33 लाख कोटींचा उद्योग होणार

भारतीयांचे सोनं-चांदी आणि दागिन्यांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. भारत सोन्याच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. पण आता काळ बदलत आहे. आता भारतात हिरा, पन्ना आणि इतर रंगीत दगडांची (रत्न) मागणीही झपाट्याने वाढतीये. या रत्नांचा व्यवसायही वेग पकडत आहे. निर्यातीच्या बाबतीतही भारताची जगात मजबूत पकड आहे. भारतातील हिरे आणि इतर रत्नांचे प्रमुख व्यापारी केंद्र गुजरात आणि राजस्थानात आहे. सुरतमध्ये जगातील सर्वात मोठा हिरे बाजार आहे, तर राजस्थानमधील जयपूर हे रत्न आणि रंगीत दगडांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक
जगातील हिरे आणि दागिन्यांच्या एकूण निर्यातीत भारताचा वाटा 3.5% आहे. या बाबतीत भारताचा जगातील टॉप-7 निर्यातदारांमध्ये समावेश आहे. जर आपण फक्त हिऱ्यांबद्दल बोललो तर भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारत जगातील 29% हिऱ्यांची निर्यात करतो. तर प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिरे आणि इतर मौल्यवान दगडांच्या बाबतीत भारताचा निर्यातीत 32.7% वाटा आहे.

100 अब्ज डॉलरचा उद्योग निर्माण होईल
भारतात रत्ने आणि दागिन्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. आपण हिरे आणि इतर दागिने वगळले, तर केवळ मौल्यवान रंगीत दगडांचा (रत्ने) व्यवसाय देखील खूप मोठा आहे. 2023 मध्ये भारतातील रत्नांचा व्यवसाय 70.78 कोटी डॉलर (सुमारे 6000 कोटी रुपये) इतका असेल. हा दरवर्षी 10 टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे. बाजाराच्या ट्रेंडनुसार 2033 पर्यंत हा $191.69 कोटी (सुमारे 15,675 कोटी) पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

आपण देशातील रत्ने आणि दागिन्यांच्या एकूण व्यापारावर नजर टाकली तर 2027 पर्यंत ची निर्यात 100 अब्ज डॉलर्स (सुमारे 8.33 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचू शकते. भारत सरकारने यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकारने UAE सोबत FTA वर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे अमेरिकेला निर्यात वाढण्यास मदत होईल. याशिवाय सरकारने कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही 7.5% वरून 5% आणि पॉलिश केलेले हिरे आणि मौल्यवान रंगीत दगडांवर शून्य केली आहे.

Web Title: Now it is not the time of gold and silver but of diamonds and emeralds, there will be an industry of 8.33 lakh crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.