नवी दिल्ली : जर तुम्ही अद्याप जनधन खाते उघडले नसेल तर ते आजच उघडा ... सणासुदीच्या काळात खाते उघडणार्या कोट्यावधी ग्राहकांना शानदार ऑफर दिल्या जात आहेत.
एटीएम कार्ड देणारी कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) रूपे फेस्टिव्ह कार्निव्हलची (Rupay Festive carnival) सुरुवात केली आहे. यामध्ये एटीएम कार्डधारकांना विशेष लाभ देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना शानदार ऑफर आणि सवलत देखील मिळणार आहेत.
NPCI ने याबाबतची माहिती दिलीNPCI कडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही ग्राहकांकडे रुपे कार्ड असेल. त्यांना अनेक कॅटगरीमध्ये लाभ मिळेल. यामध्ये तुम्हाला आरोग्य, फिटनेस, शिक्षण आणि ई-कॉमर्स या क्षेत्रातील अनेक ऑफर मिळतील. यावर्षी तुम्ही आपल्या सणासुदीचा आनंद दुप्पट करू शकता. तसेच, तुम्ही डायनिंग, फूड डिलिव्हरी, शॉपिंग, मनोरंजन, वेलनेस आणि फार्मसी यासारख्या कॅटगरीमध्ये शानदार ऑफर्ससह खरेदी करू शकता.
किती सूट मिळत आहे, पाहा...तुम्हाला ई-कॉमर्स शॉपिंग ते एज्युकेशनवर रुपे फेस्टिव्ह कार्निव्हलमध्ये सवलत मिळत आहे.>> Myntra वर १० टक्के सूट मिळेल.>> टेस्टबुक डॉटकॉमच्या टेस्ट पासवर ६५ टक्के सूट मिळेल.>> सॅमसंगची टीव्ही, एसी आणि स्मार्टफोनवर ५२ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.>> बाटावर २५ टक्के सूट देण्यात येणार आहे.>> पी अँड जी प्रोडक्टवर ३० टक्के सूट मिळत आहे.
कॅशलेस पेमेंटला मिळणार चालना NPCI ने देशभरात कॅशलेस सिस्टमला चालना देण्यासाठी या ऑफर्सविषयी माहिती दिली आहे. तसेच सणासुदीच्या काळात अॅमेझॉन, स्विगी, सॅमसंग, मिंत्रा, आजियो, फ्लिपकार्ट, शॉपर्स स्टॉप, लाइफस्टाइल, बाटा, हेमलिस, जी 5, टाटा स्काय, मॅकडोनाल्ड डोमिनो, डाइनआउट स्विगी, अपोलो फार्मसी, नेटमेड्स यासारख्या बँड्सवर ग्राहक १०-६५ टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
१० लाख रुपयांचा विमा विनामूल्य मिळणार>> रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड (RuPay Select Credit Card) सोबत १० लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण दिले जात आहे.>> परदेशात कार्डचा वापर केल्यानंतर एटीएमवर ५ टक्के आणि पीओएसवर १० टक्के कॅशबॅक दिले जाते.