Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता AI मध्येही Jio चा डंका, JioBrain व्यतिरिक्त, AI-रेडी डेटा सेंटर देखील तयार

आता AI मध्येही Jio चा डंका, JioBrain व्यतिरिक्त, AI-रेडी डेटा सेंटर देखील तयार

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. दूरसंचार बाजारात खळबळ माजवल्यानंतर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातही मोठे बदल घडवून आणणार असल्याची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 04:01 PM2024-08-29T16:01:24+5:302024-08-29T16:02:48+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. दूरसंचार बाजारात खळबळ माजवल्यानंतर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातही मोठे बदल घडवून आणणार असल्याची घोषणा केली आहे.

Now Jio's into AI too apart from JioBrain, AI-ready data center is also ready | आता AI मध्येही Jio चा डंका, JioBrain व्यतिरिक्त, AI-रेडी डेटा सेंटर देखील तयार

आता AI मध्येही Jio चा डंका, JioBrain व्यतिरिक्त, AI-रेडी डेटा सेंटर देखील तयार

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या दिशेने रिलायन्स इंडस्ट्रीजने मोठी पावले उचलली आहेत. Jio Brain AI प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, कंपनी AI तयार डेटा सेंटर्स देखील सेटअप करणार आहे.

Adani News : अदानींनी अंबानींना मागे टाकलं, संपत्तीत एका वर्षात ९५ टक्क्यांची वाढ

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. दूरसंचार बाजारात खळबळ माजवल्यानंतर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातही मोठे बदल घडवून आणणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने या एजीएममध्ये जिओ ब्रेन एआय टूल प्लॅटफॉर्मबद्दल माहिती दिली आणि एआय-रेडी डेटा सेंटर तयार करण्याचे आश्वासनही दिले आहे.

मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, जिओ आता 5G इंटीग्रेटेड सेवेसह विविध उद्योगांमध्ये AI च्या वापरावर काम करेल. नवीन प्लॅटफॉर्म जिओ ब्रेन नावाने सादर केले आहे आणि ते मोबाइल-रेडी लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणून सादर केले जाईल. हे व्यासपीठ उद्योग आणि उपक्रमांना जनरेटिव्ह एआय टूल्स वापरण्याची संधी देईल.

रिलायन्स जिओ बऱ्याच दिवसांपासून जिओ ब्रेनवर काम करत होते आणि कंपनीचे वरिष्ठ व्हीपी आयुष भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन-तीन वर्षांच्या संशोधनानंतर हे विकसित केले आहे. दीर्घकालीन चाचणीनंतर हे 5G इंटिग्रेटेड मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणून सादर केले आहे आणि या क्लाउड-आधारित सेवेमध्ये ५०० हून अधिक REST API आणि डेटा API समाविष्ट आहेत.

Jio Brain मध्ये समाविष्ट केलेल्या API च्या मदतीने कस्टम मशीन लर्निंग टूल्सचा समावेश केला जाऊ शकतो. याद्वारे कृषी, आरोग्य सेवा, शिक्षण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर अधिक सुलभ होईल, असा दावा कंपनीने केला आहे. 

रिलायन्सने म्हटले आहे की, कंपनी जामनगर, गुजरात येथे गिगावॅट स्केल एआय रेडी डेटा सेंटर्स स्थापन करेल आणि त्याला कंपनीच्या ग्रीन एनर्जीचा पाठिंबा असेल. या व्यतिरिक्त, देशाच्या विविध भागांमध्ये AI हस्तक्षेप सुविधा देखील तयार केली जाईल. 

Web Title: Now Jio's into AI too apart from JioBrain, AI-ready data center is also ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.