Manyavar-owner Vedant Fashions IPO: एथनिक वेअर ब्रँड मन्यावरची (Manyavar) ची पॅरेंट कंपनी वेदांत फॅशन्स लिमिटेडचा (Vedant Fashion) आयपीओ (IPO) पुढील आठवड्यात येणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि ८ फेब्रुवारीला बंद होईल. ३,१४९ कोटी रुपयांच्या या आयपीओसाठी प्रति शेअर ८२४-८६६ रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.
आरएचपी नुसार, कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक ३,६३,६४,८३८ इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकतील. वेदांत फॅशनचा हा आयपीओ २०२२ चा तिसरा आयपीओ असेल. कंपनीचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. त्यामुळे जमवलेल्या फंडचा कंपनीला फायदा होणार नाही.
कंपनीच्या ऑफर फॉर सेलमध्ये १.७४६ कोटी शेअर राइन होल्डिंग लिमिटेडकडून, जवळपास ७,२३००० शेअर्स केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडकडून आणि १.८१८ कोटी शेअर रवि मोदी फॅमिली ट्रस्टकडून विक्रीसाठी ठेवण्यात येतील. सध्या वंदांत फॅशनचा ७.२ टक्के हिस्सा राइन होल्डिंग्सकडे, ०.३ टक्के हिस्सा केदारा एआयएफकडे आणि ७४.६७ टक्के हिस्सा रवि मोदी फॅमिली ट्रस्टकडे आहे. अॅक्सिस कॅपिटल, एडलवाइज फायनॅन्शिअल सर्व्हिसेस, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल याचे लीड मॅनेजर असतील.