Join us

आता मोदी सरकार देणार ५ लाख रुपयांची मर्यादा असलेलं क्रेडिट कार्ड, कसं करायचं रजिस्ट्रेशन? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 22:35 IST

यावेळी सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने क्रेडिट कार्ड सुरू करण्याचीही घोषणा केली आहे. तर यासाठी कुणाला अर्ज करता येईल आणि तो कसा करावा? जाणून घेऊया...

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १० वर्षात लघु उद्योगांना प्रोत्साहन अथवा चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. याअंतर्गत, आपण कौशल्य विकासासाठी तर सरकारकडून मदत घेऊ शकताच, पण मुद्रा सारख्या योजनांचा लाभ घेऊन कर्जही मिळवू शकता. यावेळी सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने क्रेडिट कार्ड सुरू करण्याचीही घोषणा केली आहे. तर यासाठी कुणाला अर्ज करता येईल आणि तो कसा करावा? जाणून घेऊया...

काय म्हणाल्या होत्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण -केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. या वेळी त्यांनी या क्रेडिट कार्डसंदर्भात घोषणा केली होती. त्या  म्हणाल्या होत्या, "आम्ही उद्यम पोर्टलवर नोंदणी असलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी ५ लाख रुपयांची मर्यादा असलेले विशेष कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड सुरू करणार आहोत आणि पहिल्या वर्षात १० लाख कार्ड जारी केले जातील."

असं करू शकता रजिस्ट्रेशन अथवा अर्ज  -यासाठी सर्वप्रथम उद्यम पोर्टल msme.gov.in ला भेट द्या. यानंतर आपल्याला Quick Links वर क्लिक करावे लागेल. यानंतर 'Udyam Registration' वर क्लिक करावे लागेल आणि रजिस्ट्रेशन करावे लागेल. आपल्याला येथेच रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स आणि पात्रतेसंदर्भातही माहिती मिळेल. अशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन अथवा अर्ज करू शकता.

याशिवाय, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. यामुळे पाच वर्षांत दीड लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त क्रेडिट शक्य होऊ शकेल, अशी घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली होती. 

टॅग्स :नरेंद्र मोदीनिर्मला सीतारामनकेंद्र सरकार