Join us

जबरदस्त! Post Office ची खातेधारकांना भन्नाट सुविधा; आता घसरबल्या करा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 3:18 PM

देशातील एक मोठा वर्ग पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतो. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: देशातील सर्वांत विश्वासार्ह गुंतवणुकीतील एक पर्याय म्हणून Post Office च्या योजनांकडे पाहिले जाते. हमखास रिटर्न, सुरक्षा, हमी यांमुळे पोस्ट ऑफिस व्यवहारावर हजारो देशवासी विश्वास ठेवतात. गेल्या अनेक दशकांपासून पोस्ट ऑफिस आपली अविरत सेवा देत आहे. काही वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिसला बँकिंग व्यवहार सुरू करण्याचा परवाना मिळाला होता. ग्राहकांनी यालाही प्रचंड प्रतिसाद दिला. यानंतर आता पोस्ट ऑफिसने ग्राहकांसाठी एक अतिशय उत्तम अशी सुविधा आणली आहे. 

तुम्ही पोस्ट ऑफिस बँकचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बदलत्या काळानुसार पोस्ट ऑफिसनेही कात टाकली आहे. बँकांशी स्पर्धा करण्यासाठी पोस्ट ऑफिसने ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा सुरू केल्या आहेत. यामध्ये इंटरनेट बँकिंगचाही समावेश आहे. ही सुविधा तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. यासाठी तुमचे स्वत:चे किंवा संयुक्त खाते असणे आवश्यक आहे.

नेट बँकिंग सक्रिय करणे खूप सोपे आहे

तुम्ही पोस्ट ऑफिस बँकेचे खातेदार असाल, तर आता घरबसल्या नेट बँकिंगच्या माध्यमातून अनेक बँकिंग व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. पोस्ट ऑफिस खात्यात नेट बँकिंग सक्रिय करणे खूप सोपे आहे. यासाठी तुमचे खाते असलेल्या पोस्ट ऑफिसला भेट द्या. येथे तुम्हाला अर्ज भरावा लागेल.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

या अर्जासोबत  पॅन कार्ड, आधार कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुकसह इतर कागदपत्रांची फोटोकॉपी द्यावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोस्ट ऑफिस तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवेल. या लिंकमध्ये नवीन पर्याय (न्यू ऑप्शन) वर क्लिक करा. येथे लॉग इनचा पर्याय निवडा. त्यानंतर नेट बँकिंग पासवर्ड आणि दुसरा ट्रान्झॅक्शन पासवर्ड सेट करा. यानंतर पासवर्ड टाकून तुम्ही नेट बँकिंग सुरू करू शकता. त्यानंतर तुम्ही नेट बँकिंगचा लाभ घेऊ शकता.

दरम्यान, देशातील एक मोठा वर्ग पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेले चांगले व्याजदर आणि गुंतवणुकीची सुरक्षितता. इंटरनेट बँकिंग आल्यानंतर बँकांमध्ये अनेक सुविधा ग्राहकांना उपलब्ध झाल्या. ज्यामध्ये ग्राहक घरबसल्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. याशिवाय ग्राहक चेकबुक, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसबँक