मुंबई : अर्थकारणात सुधार आल्यानंतर आणि अपेक्षेप्रमाणे चलनवाढही आटोक्यात येताना दिसत असल्यामुळे आणखी दर किमान पाव टक्का दर कपात होणार का याकडे बाजाराचे लक्ष लागलेले असतानाच, आता पुढची व्याजदर कपात आगामी वर्षाच्या (२०१६) पहिल्या सहामाहीत होईल, असा अंदाज वित्तीय विश्लेषण संस्थांनी व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती सातत्याने कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून येत असून, याचसोबत देशांतर्गत अर्थकारणातूनही सकारात्मक संकेत मिळत आहेत. परिणामी, भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात तीनवेळा कपात केली. सुधाराच्या स्थितीतील सातत्य कायम राहिल्याने आणखी किमान पाव टक्के व्याजदर कपात करण्यास वाव असल्याची चर्चा उद्योग वर्तुळात आहे.
व्याजदर कपात आता नव्या वर्षातच
अर्थकारणात सुधार आल्यानंतर आणि अपेक्षेप्रमाणे चलनवाढही आटोक्यात येताना दिसत असल्यामुळे आणखी दर किमान पाव टक्का दर कपात होणार का याकडे बाजाराचे लक्ष लागलेले असतानाच
By admin | Published: November 22, 2015 11:46 PM2015-11-22T23:46:51+5:302015-11-22T23:46:51+5:30