Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता उरलेत केवळ १२ दिवस, पाहिजेत ही आवश्यक कागदपत्रे; टाळायची असेल कारवाई, तर करा घाई

आता उरलेत केवळ १२ दिवस, पाहिजेत ही आवश्यक कागदपत्रे; टाळायची असेल कारवाई, तर करा घाई

हे महत्त्वाचं काम करणं शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं आवश्यक आहेत. यासाठी आता केवळ उरलेत १२ दिवस.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 02:11 PM2023-07-19T14:11:30+5:302023-07-19T14:14:40+5:30

हे महत्त्वाचं काम करणं शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं आवश्यक आहेत. यासाठी आता केवळ उरलेत १२ दिवस.

Now only 12 days left for itr return do it fast If action is to be avoided act quickly 31st july 2023 last date | आता उरलेत केवळ १२ दिवस, पाहिजेत ही आवश्यक कागदपत्रे; टाळायची असेल कारवाई, तर करा घाई

आता उरलेत केवळ १२ दिवस, पाहिजेत ही आवश्यक कागदपत्रे; टाळायची असेल कारवाई, तर करा घाई

असेसमेंट इयर 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मागच्या वेळेप्रमाणे या वेळीही आयटीआर भरण्याची मुदत वाढेल असं वाटत असेल तर शक्यता नाहीतच जमा आहे. आयकर विभाग दररोज करदात्यांना शक्य तितक्या लवकर आयटीआर दाखल करण्यासाठी मेसेजही करत आहे. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत तुमचा आयटीआर ऑनलाइन भरू शकता. आयकर रिटर्न भरण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत जेणेकरून तुम्ही तुमचा ITR सहज भरू शकता ते पाहू.

फॉर्म 16 सर्वात महत्त्वाचा
सर्व कर्मचारी वर्गासाठी फॉर्म-16 हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज आहे, ज्याच्या मदतीनं आयटीआर दाखल केला जातो. फॉर्म 16 कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीच्या वतीनं दिला जातो. प्रत्येक कंपनीनं 15 जूनपूर्वी तो कर्मचाऱ्याला देणं आवश्यक आहे. यामध्ये कर्मचार्‍यांच्या पगारातून कर कपातीची संपूर्ण माहिती, तसेच दिलेल्या पगाराची माहिती असते. फॉर्म-16 मध्ये दोन भाग असतात. यासंबंधीची माहिती आयटीआर फॉर्ममध्ये आधीच उपलब्ध असते. तुम्हाला ती माहिती जुळवावी लागते.

फॉर्म 26एएस ची मदत
हा फॉर्म आयकर विभागाकडून जारी केला जातो. यामध्ये कोणत्याही करदात्याच्या उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या कराची संपूर्ण माहिती असते. आयकर विभागाच्या वेबसाइटवरून तुमचा पॅन क्रमांक टाकून तो तुम्हाला काढता येऊ शकतो. तुम्हाला हवे असल्यास, दोन्ही ठिकाणी कर कपात समान आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमचा फॉर्म-16 आणि फॉर्म 26AS ची तुलना देखील करू शकता. अनेक वेळा फॉर्म 26AS चुकीच्या पॅन किंवा असेसमेंट इयरमुळे कापलेला टीडीएस दाखवत नाही. असं झाल्यास तुम्ही त्यासाठी दावा करू शकणार नाही.

व्याजापासून मिळालेल्या उत्पन्नाचं सर्टिफिकेट
जर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल किंवा इतर कोणत्याही व्याज देणार्‍या योजनेत पैसे जमा केले असतील, तर व्याज उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा बँक स्टेटमेंट सोबत ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला आयकर रिटर्न भरताना योग्य माहिती मिळू शकेल. आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर करात सूट मिळू शकते.

टॅक्स सेव्हिंग प्रुफ
बरेच लोक कर वाचवण्यासाठी काही कर गुंतवणूक करतात. ज्यांना ही कागदपत्रं त्यांच्या नियोक्त्याला निर्धारित वेळेत पुरवता येत नाहीत, त्यांनी आयकर रिटर्न भरताना त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. हा कर बचत गुंतवणुकीचा पुरावा एलआयसी प्रीमियम रिसिट, पीपीएफ गुंतवणूक पासबुक, ईएलएसएस पुरावा, देणगीची पावती, शिक्षण शुल्काची पावती इत्यादी असू शकते.

मेडिकल इन्शूरन्स
कलम 80D अंतर्गत, तुम्ही 25,000 रुपयांपर्यंतच्या हेल्थ इन्शूरन्स प्रीमियमवर कर सूट मागू शकता. या पॉलिसी तुमच्यासाठी, तुमच्या जोडीदारासाठी, मुलांसाठी असू शकतात. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला 50,000 पर्यंतच्या हेल्थ इन्शूरन्स प्रीमियमवर कर सूट मिळू शकते. त्यामुळे आयकर रिटर्न भरताना या सर्व पावत्या सोबत ठेवा.

Web Title: Now only 12 days left for itr return do it fast If action is to be avoided act quickly 31st july 2023 last date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.