Join us

आता WhatsApp द्वारे डीमॅट अकाउंट उघडा,  IPO साठी करा अप्लाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 10:49 PM

WhatsApp : या सेवेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराला अपस्टॉक्समध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ते व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडोद्वारे (WhatsApp chat window) IPO साठी  अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली :  बातमीचे हेडिंग वाचून थोडे विचित्र वाटले असेल, पण हे अगदी खरे आहे. आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (WhatsApp) डीमॅट खाते (Demat Account) उघडू शकता. जर तुम्ही आधीच खाते उघडले असेल तर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप देखील वापरू शकता. इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म अपस्टॉक्सने  (Upstox) ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

अपस्टॉक्स व्हॉट्सअ‍ॅपद्वारे IPO संबंधित सेवांसाठी एंड-टू-एंड सपोर्ट प्रदान करते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराला अपस्टॉक्समध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ते व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडोद्वारे (WhatsApp chat window) IPO साठी  अर्ज करू शकतात.

5 पट वाढीची योजनाअपस्टॉक्सचे सह-संस्थापक श्रीनी विश्वनाथ (Srini Vishwanath) यांचे म्हणणे आहे की,  या इंटीग्रेशनसह अपस्टॉक्सचे आयपीओ अॅप्लिकेशन्समध्ये 5 पट वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस एक कोटी ग्राहकांचा आकडा पार करण्याची कंपनीची योजना आहे. हा आकडा सध्याच्या 70 लाख ग्राहकांपेक्षा खूपच जास्त आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरून अपस्टॉक्सपर्यंतचे व्यवहार!- ग्राहकाला अपस्टॉक्सचा व्हेरिफायड व्हॉट्सएप प्रोफाईल नंबर आपल्या मोबाईल फोनच्या कॉन्टेक्टमध्ये  सेव्ह करावा लागेल आणि व्हॉट्सअ‍ॅपवर या नंबरवर ‘hi’ पाठवे लागेल.- अपस्टॉक्सचा व्हेरिफायड व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल क्रमांक 9321261098 आहे.- व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट ‘Uva’ वापरून ‘आयपीओ अॅप्लिकेशन’ वर क्लिक करा.- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि OTP (वन-टाइम पासवर्ड) टाका.- ‘Apply for IPO’ वर क्लिक करा.- यानंतर तुम्‍ही सब्सक्राइब करू इच्‍छित असलेला IPO निवडा.

व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​वरून अपस्टॉक्सद्वारे डीमॅट खाते उघडा- व्हॉट्सअ‍ॅपमधील चॅट विंडोचा वापर करून ‘Open an Account’ वर क्लिक करा.- मोबाईल नंबर एंटर करा आणि OTP सह पडताळणी करा.- ईमेल पत्ता टाका आणि OTP सह पडताळणी करा.- जन्मतारीख टाका.- यानंतर तुमची पॅन माहिती द्या.- आता बॉट तुम्हाला काही सोप्या औपचारिकतेसाठी अपस्टॉक्स पेजवर रिडायरेक्ट करेल. यासह ही प्रोसेस पूर्ण होईल.

टीप: कोणतेही डॉक्‍यूमेंट व्हॉट्सअ‍ॅपवर अपलोड करायचे नाहीत किंवा कोणतेही डॉक्‍यूमेंट चॅटवर अॅटचद्वारे पाठवायचे नाहीत.

टॅग्स :व्हॉट्सअ‍ॅपव्यवसाय