ऑनलाइन लोकमत
बंगऴुरु, दि. ८ - गेल्यावर्षी म्यान्त्रा(Myntra) या ऑनलाइन वस्तूंची विक्री करणा-या कंपनीने संकेतस्थळ बंद करुन ग्राहकांसाठी फक्त मोबाईल अॅपवरच विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर आता फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाइच्या जगात अग्रेसर असणा-या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टने येत्या दोन महिन्यात म्हणजेच सप्टेंबरपासून संकेतस्थळ बंद करण्यात येणार असून त्यानंतर फक्त वस्तूंच्या विक्रीचे व्यवहार कंपनीच्या मोबाईल अॅपवरच करण्यात येणार आहेत.
येत्या सप्टेंबर महिन्यापासून फ्लिपकार्टची वेबसाईट बंद केली जाणार असून त्यानंतर होणारे कंपनीचे व्यवहार फक्त मोबाईल अॅपवरच होतील, असे गेल्या आठवड्यात फ्लिपकार्ट कंपनीचे चिफ प्रोडक्ट ऑफिसर पुनित सोनी यांनी टाऊन हॉल येथे झालेल्या मिटिंगमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले.