Join us

आता एकाच मोबाईल नंबरवरून कुटुंबीयांचे PVC Aadhaar Card बनवू शकता, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 4:50 PM

Aadhaar Card Update : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने यावर्षी PVC आधार कार्ड आणले आहे. जे ठेवणे सोपे आहे आणि दीर्घकाळ टिकते.

नवी दिल्ली : आधार कार्ड हे एक असे डॉक्युमेंट बनले आहे, जे प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे. आधार कार्ज शिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आधार कार्डमध्ये बरेच बदल झाले आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने यावर्षी PVC आधार कार्ड आणले आहे. जे ठेवणे सोपे आहे आणि दीर्घकाळ टिकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एकाच मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता.

यासंदर्भात UIDAI ने ट्विटरवरून माहिती दिली आहे. UIDAI ने ट्विट केले आहे की, तुमचा आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर काहीही असो, तुम्ही पडताळणीसाठी OTP प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबाइल नंबर वापरू शकता. त्यामुळे एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी PVC आधार कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकते.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्ही एका मोबाईल नंबरवरून तुमच्या संपूर्ण घरासाठी PVC आधार कार्ड बनवू शकता. PVC आधार कार्ड देखरेख करणे खूप सोपे आहे. हे प्लास्टिकच्या स्वरूपात आहे, त्याचा आकार एटीएम डेबिट कार्ड सारखा आहे, तुम्ही ते तुमच्या खिशात किंवा वॉलेटमध्ये सहज ठेवू शकता. जर तुम्हाला PVC आधार कार्ड घ्यायचे असेल तर तुम्हाला फक्त 50 रुपये मोजावे लागतील.

PVC आधार कार्डसाठी असा करा अर्ज...1. जर तुम्हाला PVC आधार कार्डसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही UIDAI वेबसाइट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in वर जाऊन करू शकता.2. वेबसाइटवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, व्हर्च्युअल आयडी क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.3. तुम्ही 50 रुपये शुल्क भरून ऑर्डर कराल, काही दिवसांनी ते तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचेल.

नोंदणीकृत मोबाइल नंबर नसेल तर कसा करावा अर्ज?तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसला तरीही तुम्ही पीव्हीसी आधार कार्डसाठी ऑर्डर देऊ शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करावा लागेल.1. तुम्ही https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint या वेबसाइटवर जा.2. तुमचा आधार कार्ड क्रमांक नोंदवा.3. सिक्युरिटी कोड टाका आणि खाली दिलेल्या my mobile not registered च्या ऑप्शनवर क्लिक करा.4. सिक्युरिटी कोड टाका आणि खाली दिलेल्या my mobile is not registered या ऑप्शनवर टिक करा5. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळालेला OTP एंटर करा.6. 50 रुपये फी भरा आणि तुमचा अर्ज पूर्ण होईल.

- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत PVC आधार कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर वितरित केले जाते.

टॅग्स :आधार कार्डतंत्रज्ञान