Operation Hafta Vasooli: रिझर्व्ह बँक (RBI) ऑनलाइन लोन अॅप्सवर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. हे लोन अॅप्स ऑनलाइन अॅप स्टोअर्सवरून काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू असून, याबाबत नियमावलीही लागू केली जात आहे. आता ऑपरेशन हफ्ता वसूलीच्या माध्यमातून यावर एक मोठं अपडेट समोर आलं आहे. आरबीआयनं लोन अॅप्सची अपडेटेड यादी तयार केली आहे आणि ही यादी लवकरच Meity (माहिती आणि प्रसारण मंत्रालय) कडे सादर केली जाईल अशी माहिती समोर आलीये. त्याआधारे मंत्रालय गुगल आणि अॅपलला याबाबत कारवाई करण्यास सांगणार आहे.Meity नं जारी केली अॅडव्हायझरीदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अॅप स्टोअरवर काही कंपन्यांचे अॅप्स पुन्हा पाहायला मिळत आहेत. नोडल मिनिस्ट्री MEITY ने याबाबत गुगल आणि ऍपलला अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यांना अशा अॅप्सवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्हाईट लिस्टनुसार, विशिष्ट मानकांची पूर्तता न करणारे आणि आरबीआयद्वारे प्रमाणित न केलेले सर्व अॅप्लिकेशन प्ले स्टोअरमधून काढून टाकावे लागणार आहेत.
अधिक सुरक्षासरकार आणत असलेल्या डिजिटल इंडिया कायद्यानंतर ही स्पेस अधिक सुरक्षित होईल आणि कंपन्या अधिक जबाबदार होतील. यासोबत सुधारणेअंतर्गत फिशिंग लिंक्स आणि टेलिकॉम नेटवर्कवरील फसवणूक रोखण्यासाठी नियमही लवकरच जारी केले जातील. गेल्या वेळीही सरकारनं तातडीनं कारवाई करत १०० हून अधिक लोन अॅप ब्लॉक केले होते.