Kumar Birla Ananya Birla : आदित्य बिर्ला समूहाचं चेअरमन कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla)यांची मोठी मुलगी अनन्या बिर्ला (Ananya Birla) हिनं संगीतातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनन्या आता आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करणार आहे. अनन्या बिर्ला हिनं आपल्या व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी संगीतातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलंय. अनन्या ग्रासिम आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन आणि आदित्य बिर्ला फॅशन सारख्या कंपन्यांच्या संचालक मंडळात आहे.
अनन्या बिर्लानं सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केलीये. "मित्रांनो, हा खूप कठीण निर्णय आहे. मी अशा टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे माझा स्वतःचा व्यवसाय आणि संगीत एकत्र सांभाळणं जवळजवळ अशक्य होत चाललं आहे," असं तिनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय.
"याचा माझ्यावर परिणाम होत आहे. पण माझ्या संगीतावर इतकी वर्ष प्रेम केल्याबद्दल सर्वांचे आभार. एक असा दिवस येईल, जेव्हा देशातील लोकांनी तयार केलेल्या इंग्रजी गाण्याचंही कौतुक करू शकू अशी अपेक्षा आहे. आपल्या देशात खूप टॅलेंट आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. संपूर्ण ताकद आता व्यवसाय क्षेत्रात लावण्याची वेळ आली आहे," अशी पोस्ट अनन्या बिर्लानं शेअर केलीये.
व्यवसायातही सक्रिय
असं नाही की अनन्या म्युझिक इंडस्ट्रीत वावरताना बिझनेसकडे लक्ष देत नाही. या काळातही तिनं बिर्ला समूहाचा कारभार सांभाळला होता. ती स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या स्टार्टअपची फाऊंडर आहे. तिच्या कंपनीनं गेल्या वर्षी सचिन बन्सल यांची कंपनी चैतन्य इंडिया विकत घेतली होती. सुमारे १५०० कोटी रुपयांत त्यांनी हा व्यवहार झाला होता. अनन्या बिर्लानं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे सारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलं आहे