Join us  

आता आॅनलाईन गेमिंगमधून मिळणारे उत्पन्नही जाहीर करावे लागणार

By admin | Published: September 04, 2015 10:05 PM

ई-वॉलेट किंवा व्हर्चुअल कार्डचा वापर करणाऱ्यांना आणि आॅनलाईन गेमिंग किंवा विदेशात चालणाऱ्या वेबसाईटवरील पोकर खेळून पैसा कमावणाऱ्यांना आता

नवी दिल्ली : ई-वॉलेट किंवा व्हर्चुअल कार्डचा वापर करणाऱ्यांना आणि आॅनलाईन गेमिंग किंवा विदेशात चालणाऱ्या वेबसाईटवरील पोकर खेळून पैसा कमावणाऱ्यांना आता अशाप्रकारचे आपले उत्पन्न काळा पैसा अनुपालन सुविधेअंतर्गत जाहीर करावे लागणार आहे. ही सवलत ३० सप्टेंबरला संपणार आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आपल्या ‘२७ एफएक्यू’च्या दुसऱ्या संचात ही माहिती दिली आहे. त्यानुसार ई-वॉलेट किंवा व्हर्चुअल कार्ड हे सामान्यपणे बँक खात्यांसारखेच आहेत. त्यामुळे एखाद्या ई-वॉलेट खात्याचे मूल्यांकन व घोषणा एखाद्या बँक खात्याप्रमाणेच केली जाऊ शकते.विदेशातून चालविण्यात येणाऱ्या बेबसाईटवर ई-वॉलेट किंवा व्हर्चुअल कार्ड खाते बाळगणाऱ्यांना नव्या काळा पैसा कायद्याअंतर्गत आपले उत्पन्न जाहीर करावे लागेल काय, या विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सीबीडीटीने ही घोषणा केली. ई-वॉलेट किंवा व्हर्चुअल कार्डचा वापर बहुधा आॅनलाईन गेम किंवा पोकर खेळण्यासाठी केला जातो. एखाद्याला अघोषित बँक खात्याच्या संदर्भात अनुपालन सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याला खाते उघडण्याच्या तारखेपासूनच जमा रकमेचा तपशील द्यावा लागेल आणि ६० टक्के कर व दंड भरावा लागेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)