कोटा : मातीची तपासणी, पिकांची स्थिती, लागणारे पाणी, लागणारी कीड या गोष्टी संपूर्ण माहिती तसेच पिकावरील संकटाची आगाऊ सूचना देणारा रोबोट राजस्थानच्या कोटा येथील किशोरवयीन मुलाने कृत्रिम तंत्रज्ञानाच्या (एआय) साहाय्याने तयार केला आहे. त्यासाठी त्याला ५० हजार रुपये खर्च आला.
आर्यन सिंह (वय १७) असे त्या मुलाचे नाव असून, त्याने बनविलेल्या रोबोटचे नाव ॲग्रोबोट आहे. या कामगिरीबद्दल आर्यनला विज्ञान-तंत्रज्ञान गटामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाला होता.
शेतकरी कुटुंबात जन्मnआर्यन सिंह याने सांगितले की, मी शेतकरी कुटुंबातील आहे. वडील, आजोबांना शेतात काम करताना मी पाहत आलो होतो. nमी १०वीत शिकत असताना शेतीसाठी बहुपयोगी रोबोट तयार करण्याचे ठरविले. त्याने प्रस्ताव नीती आयोग व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पाठविला. त्यांनी या संकल्पनेचे कौतुक केले होते.