नवी दिल्ली : भारतीय नागरिकांच्या परदेशातील संपत्तीवर आता प्राप्तिकर खात्याची तीक्ष्ण नजर राहणार आहे. यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर खात्याचे देशभरात १४ झाेनल कार्यालयांतर्गत विदेशी परिसंपत्ती तपास विभाग स्थापन करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांची परदेशातील अघाेषित मालमत्ता तसेच काळा पैसा जमा करण्याच्या प्रकरणांचा या विभागाकडून तपास करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर या विभागासाठी दाेन महिन्यांपूर्वीच ६९ पदांना वेगळे करण्यात आले हाेते.
भारताने काही देशांसाेबत करार केले असून, संबंधित देशांसाेबत काळा पैसा तसेच अघाेषित मालमत्तेची माहिती एकमेकांना पुरविण्यात येते. त्यामार्फत बेकायदा गाेळा केलेल्या विदेशी मालमत्तेबाबत बरीच माहिती मिळत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासाला गतीमनी लाँड्रिग, दहशतवादाला पैसा पुरविणे तसेच करचाेरीला आळा घालण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून माहिती प्राप्त हाेते. आता नव्या विभागातून परदेशी मालमत्तेबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे काळ्या पैशासंबंधी प्रकरणांच्या तपासाला गती मिळणार आहे.
‘बिटकॉइन’चे मूल्य ४० हजार डॉलर पारनवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचे मूल्य पहिल्यांदाच ४० हजार डॉलरपेक्षा अधिक झाले आहे. बिटकाॅइनचे मूल्य अवघ्या ५ दिवसांत १० हजार डॉलरनी वाढले आहे.शनिवारच्या सत्रात बिटकॉइनच्या मूल्यात १०.४ टक्क्यांची वाढ झाली. सायंकाळी ६.२०वा. बिटकॉइनचे मूल्य ४०,३८० डॉलर झाले, नंतर थोडी घसरण होऊन ते ३८,९५० डॉलरवर आले. गेल्या शनिवारी बिटकॉइन पहिल्यांदा ३० हजार डॉलरवर होते.
लाेह खनिजाच्या दरात वाढ
नवी दिल्ली : काेराेनाचा परिणाम आणि माेठ्या प्रमाणावर लाेह खनिज निर्यातीमुळे देशात स्टीलचे दर वाढले आहेत. सरकारकडून नजीकच्या काळात निर्यातबंदीची शक्यता नसल्याने स्टीलचे दर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारतात ओडिशामध्ये सर्वाधिक लाेह खनिज आढळते. काेराेना महामारीच्या काळात चीन आणि ऑस्ट्रेलियाकडून मागणीमध्ये माेठी वाढ नाेंदविण्यात आली. त्यामुळे निर्यातही माेठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लाेह खनिजाचे दर वाढले आहेत. याशिवाय देशांतर्गत अडचणींचाही स्टील कंपन्यांना सामना करावा लागला आहे. परिणामी, स्टीलचे दर सुमारे ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यातून दिलासा मिळण्यासाठी स्टील कंपन्यांनी निर्यातबंदीची मागणी केली आहे. स्टीलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे बांधकाम, तसेच ऑटाेमाेबाइल क्षेत्राला माेठा फटका बसला आहे.