Join us

आता सरकारकडून घ्या ८० रु. किलाे दराने टाेमॅटाे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 6:24 AM

‘एनसीसीएफ’कडून दाेन दिवसांत ३५ हजार किलाे विक्री, आणखी शहरांचा हाेणार समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने  काही शहरांमध्ये ८० रुपये प्रतिकिलाे या दराने टाेमॅटाे विक्री सुरू केली आहे. लवकरच आणखी शहरांमध्ये या दराने विक्री करण्यात येईल. सरकारने ५००हून अधिक ठिकाणी टाेमॅटाेच्या दरांचा आढावा घेऊन ८० रुपये प्रतिकिलाे हा दर निश्चित केला आहे. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून टाेमॅटाेची स्वस्त दरात विक्री करण्यात येत आहे.  दिल्ली, नाेयडा, लखनाै, कानपूर, पाटणा, वाराणसी, मुजफ्फरपूर, आरा आदी ठिकाणी स्वस्तात विक्री हाेत आहे. एनसीसीएफने दाेन दिवसांत ३५ हजार किलाे टाेमॅटाे विकले. 

टाेमॅटाेमुळे कांद्याबाबत सावध पवित्राnटाेमॅटाेचे दर अचानक वाढल्यानंतर सरकारने कांद्याच्या बाबतीत सावध पावित्रा घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात पुरेसा बफर स्टाॅक राहावा म्हणून ३ लाख टन कांदा खरेदी केला आहे.nताे सुरक्षित ठेवण्यासाठी भाभा अणू संशाेधन केंद्राच्या मदतीने चाचणी करण्यात येत आहे. ग्राहक सचिव राेहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. गेल्यावर्षी केंद्राने बफर स्टाॅक म्हणून २.५१ लाख टन कांदा खरेदी केला हाेता. महाराष्ट्रात प्रयाेग महाराष्ट्रातील लासलगाव येथे ‘काेबाल्ट-६०’च्या गामा किरणांचा वापर करून कांद्याच्या साठवणुकीसाठी प्रयाेग करण्यात येत आहे. त्यासाठी १५० टन कांदा वापरला जात आहे. 

टॅग्स :शेतकरी