सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी आता लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकार सर्वच शनिवारी बँकांना सु्ट्टीची घोषणा करण्याबाबत निर्णय घेणार आहे. बँकांचे आठवड्यातील पाच दिवस कामाचे प्रपोजल सरकारपर्यंत पोहोचले आहे. यासंदर्भात राज्यसभा खासदार सुमित्रा बाल्मिक यांनी अर्थ मंत्रालयाला सभागृहात प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आठवड्यातून ५ दिवस कामकाजाचा प्रस्ताव प्राप्त झाल्याची कबुली दिली.
डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारचा 'मास्टरप्लॅन'; महागाईवर प्रभावी ठरणार 'हा' उपाय
सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, इंडियन बँक्स असोसिएशनने सर्व शनिवार बँकांमध्ये सुटी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे मान्य केले आहे. IBA ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची व्यवस्थापन संस्था आहे.
राज्यसभा खासदार सुमित्रा बाल्मिक यांनी विचारले होते की, बँक युनियन किंवा इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजेच IBA कडून बँकांमध्ये ५ दिवसीय कृती योजना लागू करण्याबाबत काही मागणी करण्यात आली आहे का? याची अंमलबजावणी करण्यासाठी काही योजना आहेत का?
याला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री म्हणाले की,होय आयबीएने सर्व शनिवार बँकिंग सुटी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. २०.८.२०१५ च्या अधिसूचनेनुसार प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार बँकांसाठी सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली होती. जर सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर बँक कर्मचार्यांशिवाय ग्राहकांनाही मोठी सुविधा मिळणार आहे.