Join us

आता RO चा एक्झिक्युटिव्ह तुम्हाला फसवू शकणार नाही, कँडलची लाईफ सांगणं होणार अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 2:12 PM

आत्तापर्यंत जो एक्झिक्युटिव्ह येईल त्यानुसार ग्राहकाला निर्णय घ्यायचा होता. आता माहिती स्पष्ट असल्यामुळे पैसेही वाया जाणार नाहीत.

Right to Repair: ग्राहक व्यवहार विभागानं (DoCA) सर्व वॉटर प्युरिफायर (RO) उत्पादक कंपन्यांना भौगोलिक क्षेत्राच्या आधारावर कँडलचं (Candel) लाईफ घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या भागात स्पेअर पार्ट्सची उपलब्धता, दुरुस्ती, वॉरंटी ओव्हरेज अटी स्पष्टपणे सांगितल्या केल्या जात नाहीत त्या देखील ग्राहकांच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम करतात, यावरही ग्राहकांच्या हितासाठी जोर देण्यात आला आहे. नवीन सूचनांनंतर आरओ एक्झिक्युटिव्ह तुमची फसवणूक करू शकणार नाही. आत्तापर्यंत जो एक्झिक्युटिव्ह येईल त्यानुसार ग्राहकाला निर्णय घ्यायचा होता. आता माहिती स्पष्ट असल्यामुळे पैसेही वाया जाणार नाहीत. 

राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिन २०२२ निमित्त, राइट टू रिपेअर पोर्टल इंडिया ( https://righttorepairindia.gov.in/ ) लॉन्च करून एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे . हे पोर्टल ग्राहकांना त्यांच्या उत्पादनांची दुरुस्ती आणि ई-वेस्ट कमी करण्यासंबंधी माहिती मिळवण्यास मदत करते. 

राईट टू रिपेयरवर फोकस 

विभागानं, DoCA चे सचिव रोहित कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, ग्राहक हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांची दुरुस्ती करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना प्रभावित करणाऱ्या नवीन आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी चार क्षेत्रांतील प्रमुख भागधारकांसह एक बैठक आयोजित केली. ऑटोमोबाईल, कंझ्युमर ड्युरेबल्स, मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी उपकरणं या क्षेत्रांना 'राइट टू रिपेअर पोर्टल इंडिया' वर आणण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

टॅग्स :व्यवसायसरकार