महिंद्राची बोलेरो कार बेस्ट सेलिंग मॉडेलपैकी एक कार आहे. आता, बोलेरो निओ प्लस लाँच करण्याची तयारी सुरू आहे. कंपनी या कारसाठी दोन सीट कॉन्फिगरेशन सिस्टीम अवलंबत आहे. त्यामध्ये, ७ सीटर आणि ९ सीटर असा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे.
यूटिलिटी व्हेईकल्सच्या स्पर्धेत महिंद्रा कारला ग्राहकांची मोठी पसंती आहे. कंपनीकडून सातत्याने पोर्टफोलियोचा विस्तार करण्यासह मॉडेल्समध्ये अपडेटही करत असल्याचे दिसून येते. आता कंपनीकडून महिंद्राच्या लोकप्रिय Bolero Neo Plus (+) कारचे नवीन अपडेटे व्हर्जन बाजारात येत असल्याचे समजते. सप्टेंबर महिन्यात ही कार खरेदीसाठी ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. टीयर-२ सिटीच्या ग्राहकांना लक्ष्य करुन ही कार नव्या अवतारात मार्केटमध्ये येत आहे.
मूळ रूपात ही TUV300 Plus मॉडेलचेही फेसलिफ्ट व्हर्जन असणार आहे, अतिशय कमी वेळात ह्या कारला बाजारात उतरवण्यात आले होते. नवीन बोलेरो निओ प्लस मध्येही ग्राहकांना सीटिंग कॅपेसिटी आणि स्पेसची सुविधा मिळणार आहे. कंपनीकडून दोन सीट कॉन्फिगरेशनमध्ये ही कार सादर करण्यात येत आहे. ज्यात ७ सीटर आणि ९ सीटरचा पर्याय ग्राहकांना असणार आहे. त्यामुळे, कमी खर्चात जास्त सीट्स आणि मोठी स्पेसची कार खरेदी इच्छुणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार लक्षवेधी ठरू शकते.
महिंद्राकडून ह्या SUV ची चाचणी २०१९ पासूनच करण्यात येत होती. आता, लवकरच ही कार मार्केटमध्ये उतरणार आहे. बोलेरो लाइन-अपचे हे तिसरे मॉडेल असणार आहे. यापूर्वी बोलेरो आणि बोलेरो निओची विक्री करण्यात आली आहे. आता, बोलेरो निओ प्लस लवकरच ग्राहकांच्या भेटीला येत आहे. ७ व्हेरीयंटमध्ये ही कार सादर होत आहे. त्यात, रुग्णवाहिकेच्या रुपातही ही कार दिसेल. महिंद्रा कंपनीकडून विक्री करण्यात येत असलेल्या कारपैकी बोलेरो हा बेस्ट सेलिंग ब्रँड आहे. दर महिन्याला कंपनीकडून ७ ते ८ हजार कारची विक्री होते. ग्रामीण आणि शहरी भागातही या कारला पसंती आहे. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकांचा विश्वास या कारने अधिक जिंकलाय, असे दिसून येते.