Join us  

आता रेफ्रिजरेटर 'गार' करणार खिसा; ५ टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार, स्टार रेटिंगमुळे होणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 9:39 AM

ऊर्जा दक्षता ब्युरोने (बीईई) इलेक्ट्रिक उपकरणांना देण्यात येणाऱ्या स्टार रेटिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : उन्हाळा असो किंवा हिवाळा, प्रत्येकालाच घरी रेफ्रिजरेटर हवा असतो. मात्र, नव्या वर्षात रेफ्रिजरेटरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ५ टक्क्यांनी किंमत वाढणार आहे.ऊर्जा दक्षता ब्युरोने (बीईई) इलेक्ट्रिक उपकरणांना देण्यात येणाऱ्या स्टार रेटिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यावरून संबंधित उपकरणाद्वारे वीजबचत किती होऊ शकते, याचा अंदाज येतो.

काय आहेत नवे नियम?■ नव्या नियमांनुसार, फ्रॉस्ट फ्री मॉडेल्समध्ये फ्रीझर आणि रेफ्रिजरेटर युनिटसाठी स्वतंत्रपणे स्टार रेटिंग द्यावी लागणार आहे, तसेच रेफ्रिजरेटरची शुद्ध क्षमता किती हेही सांगावे लागणार आहे.■ ही क्षमता म्हणजे, रेफ्रिजरेटरमध्ये किती तरल पदार्थ भरता येईल, याचे मोजमाप दरवाजा आणि शेल्फच्या मधल्या जागेला आता कंपन्यांना वगळावे लागणार आहे.वीज वापर कमी करण्यासाठी उपकरणांमध्ये बदल करावे लागतात. त्यामुळे २ ते ५% किंमत वाढणार असल्याचे या क्षेत्रातील काही उत्पादन कंपन्यांतर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :व्यवसाय