Join us

RBI ने ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचीही वेळ बदलली, RTGS अन् NEFT 'या' नव्या वेळेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:49 AM

डिजिटल इंडियात ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये मोठी वाढ झाल्याने यासाठीच्या वेळेतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली - डिजिटल इंडियामुळे ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. तर, बँकांच्या रागांपासून सुटका करुन घेण्यासाठी इंटरनेट बँकिंगलाही प्राधान्य दिलं जात आहे. त्यासाठी RTGS आणि NEFT ट्रान्झॅक्शन प्रक्रिया अवलंबली जात आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. RTGS आणि NEFT च्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. 

डिजिटल इंडियात ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये मोठी वाढ झाल्याने यासाठीच्या वेळेतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सकाळी 8 वाजता या व्यवहारासाठी सुरुवात होत, पण नव्या नियमानुसार सकाळी 7 वाजता हे व्यवहार सुरू होतील. या महिन्यातील 26 तारखेपासून या व्यवहाराची वेळ बदलली जाईल. सध्या ग्राहकांच्या आवक-जावक व्यवहारासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंतच ऑनलाईन व्यवहार करण्यात येतात.  

RTGS आणि NEFT मधील फरक

RTGS - आरटीजीएस ऑनलाईन व्यवहारामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 7.45 वाजेपर्यंत देणे आणि घेणे व्यवहार करता येत येतो. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असलेल्या सुट्टीदिवशी ही ऑनलाईन व्यवहारप्रणालीही बंद असते. मोठी रक्कम पाठविण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कमीत कमी 2 लाख तर जास्तीत जास्त कितीही रक्कम पाठवता येते. 

NEFT - नुकतेच आरबीआयने या ऑनलाईन व्यवहारप्रणालीत 24 तासांसाठी व्यवहार घेणे-देणे करण्यात मुभा देण्यात आली आहे. गेल्या महिन्यातील डिसेंबर महिन्यापासून ही सुविधा सुरू झाली आहे. तर NEFT मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यवहार करता येतो. या व्यवहारांमध्ये 2 लाखांपर्यंत रुपये पाठवता येतात. दरम्यान, आता 26 ऑगस्टपासून 8 ऐवजी सकाळी 7 वाजल्यापासून ही सुविधा सुरू होत आहे.  

टॅग्स :ऑनलाइनभारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रबँक