नवी दिल्ली : टॉमेटोचे भाव येथील बाजारात पुरवठ्यात घट झाल्यामुळे गेल्या महिनाभरात तब्बल ५० टक्क्यांनी वधारून ६२ रुपये किलो झाले. अधिकृत आकडेवारीनुसार येथे महिनाभरापूर्वी टोमॅटो ४२ रुपये किलो होते. टोमॅटोंच्या भावातील वाढीचा हाच कल सगळ्या महत्त्वाच्या केंद्रांवरही होता. तेथेही महिनाभरापूर्वी टोमॅटो ३० रुपये किलो होते. पुरवठ्यात काहीशी वाढ झाल्यामुळे येथील आझादपूर मंडीमध्ये टोमॅटोंचा घाऊक भाव गेल्या दोन दिवसांत खाली येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात टोमॅटोचा पुरवठा सणाच्या सुट्यांमुळे कमी झाला व पर्यायाने त्याच्या किमती वाढल्या, असे आझादपूर मंडईतील टोमॅटोचे व्यापारी सुभाष चूक यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘घाऊक बाजारात उत्तम प्रतीचे टोमॅटो २० ते २५ रुपये किलो असून सोमवारी त्यांचा भाव ३०-३५ रुपये किलो होता. पुरवठ्यात सुधारणा होत असल्यामुळे येत्या काही दिवसांत त्याचे भाव खाली येण्याची अपेक्षा आहे.’’पाम तेल दरात वाढ कच्च्या पाम तेलाच्या किमतीत आज ०.७१ टक्क्यांची वाढ झाली. प्रति दहा कि.ग्रॅमसाठी या तेलाची किंमत ३९७ रुपये होती. बाजारपेठेतील तज्ञांनी सांगितले की, बाजारपेठेत मागणी वाढल्याने पाम तेलाच्या किमतीत ही वाढ झाली. दरम्यान, येथील मंडईत कांद्याचा पुरवठा वाढल्यामुळे किरकोळ विक्रीचा भाव ५७ रुपयांवरून ४३ रुपये किलो झाला. बाजारात कांद्याचे नवे पीक यायला सुरुवात झाली की त्याचे भाव आणखी खाली येतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली. बासमती तांदूळ २५० रुपयांनी महागउत्पादकांकडून कमी प्रमाणात पुरवठा झालेला असताना बासमती तांदळाचा साठा करणाऱ्यांकडून त्याची खरेदी होत असल्यामुळे येथील घाऊक बाजारात मंगळवारी या तांदळाने क्विंटलमागे २५० रुपयांची उसळी घेतली. उत्पादकांकडून मर्यादित प्रमाणात पुरवठा झाल्यामुळे साठा करणाऱ्यांकडून खरेदी वाढली व बासमती तांदळाचे भाव वधारले. कमी उत्पादनामुळेही त्याच्या भावात तेजी आल्याचे त्यांचे मत आहे. बासमती तांदूळ (सामान्य) आणि पुसा- ११२१ जातीच्या भावात २५० रुपये वाढ होऊन अनुक्रमे त्यांचे भाव ४८००-४९०० आणि ४००० -४६०० असे होते.हरभरा डाळआणखी महागली मागणी वाढल्याने दिल्लीतील ठोक बाजारात आज हरभरा डाळीचे दर क्विंटलमागे २५० रुपयांनी वाढले. हरभरा डाळीचे दर ५२०० ते ५८०० रुपयांवरून ५४५० ते ६००० रुपये क्विंटलवर बंद झाले.
...आता टोमॅटो महागले
By admin | Published: November 18, 2015 3:25 AM