Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता परदेशातून भारतात येणारे पर्यटकही UPI द्वारे करू शकतील पेमेंट,  RBI च्या बैठकीत घोषणा

आता परदेशातून भारतात येणारे पर्यटकही UPI द्वारे करू शकतील पेमेंट,  RBI च्या बैठकीत घोषणा

UPI : शक्तीकांत दास म्हणाले की, आता परदेशातून भारतात येणारे पर्यटक देखील यूपीआय (UPI) वापरू शकतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:36 PM2023-02-08T14:36:47+5:302023-02-08T14:38:00+5:30

UPI : शक्तीकांत दास म्हणाले की, आता परदेशातून भारतात येणारे पर्यटक देखील यूपीआय (UPI) वापरू शकतील.

now tourists coming to india from abroad will also be able to pay through upi this was announced in the rbi meeting | आता परदेशातून भारतात येणारे पर्यटकही UPI द्वारे करू शकतील पेमेंट,  RBI च्या बैठकीत घोषणा

आता परदेशातून भारतात येणारे पर्यटकही UPI द्वारे करू शकतील पेमेंट,  RBI च्या बैठकीत घोषणा

नवी दिल्ली : आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनविषयक धोरण बैठक झाली. आज चलनविषयक धोरण बैठकीचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. ही बैठक 3 दिवस सुरू होती. बैठकीत रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. नवीन रेपो दर आता 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के झाला आहे. या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी इतरही मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

आजच्या बैठकीत  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आता परदेशातून भारतात येणारे पर्यटक देखील यूपीआय (UPI) वापरू शकतील. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठीही यूपीआय सुविधा सुरू करण्यात येणार आहे. परदेशी पर्यटकांसाठी यूपीआय सुविधा लवकरच सुरू होणार आहे. मात्र, ही सुविधा काही विमानतळांवरच उपलब्ध असणार आहे. तसेच, जी-20 मधून येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा आधी वापरली जाईल.

UPI द्वारे करता येतात पैसे ट्रान्सफर 
यूपीआय हे डिजिटल मनी ट्रान्सफर टूल आहे. पैशाचे व्यवहार सुलभ करण्यासाठी डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत यूपीआयची सुरुवात करण्यात आली होती. यूपीआयसह, तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात लगेच पैसे पाठवू शकता. यूपीआयच्या मदतीने, दोन व्यक्ती मोबाईल प्लॅटफॉर्मवर डिजिटल पद्धतीने एकमेकांना पैसे पाठवू शकतात. हा व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणत्याही यूपीआयमध्ये बँक खाते जोडण्यासाठी तुमच्या बँकेत यूपीआय सुविधा असणे आवश्यक आहे आणि तुमच्या फोनवर यूपीआय अॅप्लिकेशन असल्‍याने काम आणखी सोपे होते.

रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ
देशात महागाईचा दर कमी झाला असला तरी सर्वसामान्यांवरील महागाईचा बोजा सातत्याने वाढतच आहे. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरामध्ये 25 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दरामध्ये वाढ केली आहे. या काळात रेपो दर एकूण 2.25 एवढा वाढला आहे. त्यामुळे सध्या रेपो दर हा 6.50 टटक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दर वाढल्याने सर्व प्रकारचे होम, ऑटो आणि पर्सनल लोन वाढले आहे. 

Web Title: now tourists coming to india from abroad will also be able to pay through upi this was announced in the rbi meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.