Join us

आता ‘इज आॅफ ट्रेडिंग, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूंचे सूतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:55 PM

मुंबई : ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ नंतर आता ‘इज आॅफ ट्रेडिंग’ येत आहे.

मुंबई : ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ नंतर आता ‘इज आॅफ ट्रेडिंग’ येत आहे. देशातील पाच-सहा दुर्लक्षित क्षेत्रांना मुख्य प्रवाहात आणून निर्यातदारांना त्याद्वारे प्रोत्साहन देण्याचे सुतोवाच केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी येथे केले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसएई) ‘इमर्ज’ या लघु-मध्यम उद्योग (एसएमई) एक्सचेंजमध्ये सोमवारी १०० वा आयपीओ प्रविष्ट झाला. ‘निफ्टी५०’च्या धर्तीवर निफ्टी एसएमई निर्देशांकाचेही उद्घाटन प्रभू यांनी केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.मूडीजच्या अहवालाने बाजारात उत्साह आला आहे. तरीही पाच-सहा निर्यातक्षम क्षेत्रे दुर्लक्षित आहेत. त्यांच्या क्षमतेला नेमका प्लेटफॉर्म उपलब्ध करून देणे आणि निर्यातदारांना सुविधा देणे, हा त्याचा हेतू आहे. जगभरातील गरजेनुसार त्यासंबंधीची सेवा अथवा वस्तू कशी निर्यात करायची, याबाबतचे धोरण आखून ‘इज आॅफ ट्रेडिंग’ आणले जाईल, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.मेक इन इंडियापाठोपाठ ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडिया’ धोरण आणणार असल्याची माहितीही प्रभू यांनी दिली. त्याअंतर्गत जुन्या तंत्रज्ञानाच्या कंपन्यांचे आधुनिकीकरण केले जाईल. फार्मा व विशेषत: जेनेरिक औषधांच्या क्षेत्रात भारतीय कंपन्या चांगले काम करीत आहेत. अशा नवीन कंपन्या स्थापन केल्या जातील आणि दुर्लक्षित क्षेत्रांतील खासगी कंपन्यांना मंच उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रभू यांनी सांगितले.>निफ्टीचा स्वतंत्र ‘एसएमई’ निर्देशांकयावेळी एनएसई ‘निफ्टी ५०’च्या धर्तीवर एसएमई एक्सचेंजचा स्वतंत्र निर्देशांक सादर झाला. १ डिसेंबर २०१६ च्या आधारे एक्सचेंजमधील एकूण भांडवलाच्या ६२ टक्के भांडवलावर हा निर्देशांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर २०१७ ला हा निर्देशांक ३९ टक्के परताव्यासह निफ्टीपेक्षा १६ टक्के पुढे होता.> एनएसईच्या एसएमई एक्सचेंजमध्ये १०० व्या आयपीओला घंटा वाजवून प्रविष्ट करताना वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू. सोबत एनएसईचे सीईओ विक्रम लिमये वअन्य पदाधिकारी व उद्योजक.)

टॅग्स :सुरेश प्रभू