Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता आणखी दाेन माेठ्या कंपन्यांत कर्मचारी कपात! ॲमेझाॅन, काॅग्निझंटने दिला झटका

आता आणखी दाेन माेठ्या कंपन्यांत कर्मचारी कपात! ॲमेझाॅन, काॅग्निझंटने दिला झटका

ट्विटर, मेटा, मायक्राेसाॅफ्ट इत्यादी कंपन्यांनी अलीकडे माेठी नाेकरकपात केली हाेती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 06:36 AM2022-11-12T06:36:00+5:302022-11-12T06:36:24+5:30

ट्विटर, मेटा, मायक्राेसाॅफ्ट इत्यादी कंपन्यांनी अलीकडे माेठी नाेकरकपात केली हाेती.

Now two more major companies pay cut staff Amazon Cognizant gave a blow | आता आणखी दाेन माेठ्या कंपन्यांत कर्मचारी कपात! ॲमेझाॅन, काॅग्निझंटने दिला झटका

आता आणखी दाेन माेठ्या कंपन्यांत कर्मचारी कपात! ॲमेझाॅन, काॅग्निझंटने दिला झटका

नवी दिल्ली :

ट्विटर, मेटा, मायक्राेसाॅफ्ट इत्यादी कंपन्यांनी अलीकडे माेठी नाेकरकपात केली हाेती. त्यापाठाेपाठ ई- काॅमर्स क्षेत्रातील माेठी कंपनी ॲमेझाॅनने कर्मचारी कपातीला सुरुवात केल्याची माहिती सुत्रांनी दिली. कंपनीने राेबाेटिक्स टीममधील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना घरी बसविल्याचे सुत्रांनी सांगितले. तर काॅग्निझंट या आयटी कंपनीनेही अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.  

प्राप्त माहितीनुसार, ‘ॲमेझाॅन इंक’ने राेबाेटिक्स टीममधील सुमारे ३,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीतर्फे नाॅन प्राॅफिटेबल बिझनेसची समीक्षा करण्यात येत आहे. त्यात व्हाइस असिस्टंट ॲलेक्सा युनिटचाही समावेश आहे. ॲमेझाॅनकडून या घडामाेडींबाबत काेणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

काॅग्निझंटनेही केली हकालपट्टी
ॲक्सेंचर या आयटी कंपनीने अनुभवाचे खाेटे प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली हाेती. आता काॅग्निझंट या कंपनीनेही याच कारणांमुळे सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसविल्याची माहिती समाेर आली आहे. 
तंत्रज्ञान कंपन्यांची कपात  
ट्विटर     ३,७००
मायक्राेसाॅफ्ट     १,०००
मेटा         ११,०००
लाइफ्ट         ७००
टेन्सेंट         ५,५००
बायजूस         २,५००
 

Web Title: Now two more major companies pay cut staff Amazon Cognizant gave a blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.