टीव्ही पाहणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्हालाही टीव्ही पाहणे आवडत असेल तर त्याआधी तुम्हाला ट्रायच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. भारत दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. TRAI ने नवीन टॅरिफ ऑर्डर 2.0 मध्ये सुधारणा केली आहे, ज्यामुळे कोट्यवधी ग्राहकांवर त्याचा परिणाम होईल. आता नवीन नियम काय आहेत ते पाहूया.
नवीन नियमांनुसार, 19 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीचे सर्व चॅनेल बुकेमध्ये समाविष्ट करता येऊ शकतील. ट्रायच्या या निर्णयानंतर केबल आणि डीटीएच ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रायकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहेत. 1 फेब्रुवारीनंतर ग्राहकांना त्यांनी निवडलेल्या चॅनेल किंवा बुकेनुसार सेवा पुरवल्या जातील हे सुनिश्चित करावे असेही ट्रायने नमूद केले आहे.
बदलांबद्दल माहिती द्यावी लागणार
सर्व ब्रॉडकास्टर्स 16 डिसेंबरपर्यंत आपले चॅनल, चॅनलचे एमआयपी आणि चॅनलच्या बुके स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही प्रकारातील बदलांबाबत माहिती देतील असंही ट्रायने स्पष्ट केलेय. बुकेची किंमत निश्चित करताना, ब्रॉडकास्टर त्यात समाविष्ट असलेल्या सशुल्क चॅनेलच्या कमाल किरकोळ किंमतीच्या बेरजेमधून जास्तीत जास्त 45 टक्के सूट देऊ शकतात, असेही ट्रायने म्हटले आहे.