Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री फाईल करा ITR, फक्त पगाराची माहिती द्यावी लागेल, जाणून घ्या सविस्तर...

आता 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री फाईल करा ITR, फक्त पगाराची माहिती द्यावी लागेल, जाणून घ्या सविस्तर...

ITR file : 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:15 PM2021-08-18T12:15:29+5:302021-08-18T12:22:48+5:30

ITR file : 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

now you can file income tax return without any cost via these 4 website check details | आता 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री फाईल करा ITR, फक्त पगाराची माहिती द्यावी लागेल, जाणून घ्या सविस्तर...

आता 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री फाईल करा ITR, फक्त पगाराची माहिती द्यावी लागेल, जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : जर तुम्हाला टॅक्स रिटर्न (Income tax return) फाईल करायचे असेल, तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Filling) करण्यासाठी काही वेबसाइट्स आहेत, त्याद्वारे तुम्ही मोफत टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. (now you can file income tax return without any cost via these 4 websites)

तुम्हाला या वेबसाइट्सवर तुमचा फॉर्म-16 सादर करणे आवश्यक आहे. तसेच, तुमचा पगार आणि उत्पन्नाशी संबंधित आवश्यक माहिती द्यावी लागेल. दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

आयकर विभागाने रिटर्न ई-फायलिंगसाठी एक पोर्टल तयार केले आहे, ज्याद्वारे तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. याशिवाय, काही खासगी संस्था त्यांच्या वेबसाइट्सद्वारे मोफत ई-फायलिंग करण्याची सुविधा देत आहेत.


ClearTax :
क्लिअरटॅक्स (ClearTax) करदात्यांना आयकर वेबसाइटवर लॉग इन न करता थेट आयटीआर दाखल करण्याची परवानगी देते. या प्लॅटफॉर्मवर आपोआप उत्पन्नाच्या आधारे आयटीआर दाखल करण्याविषयी माहिती दिली जाते.
अशाप्रकारे क्लिअरटॅक्सवर आयटीआर दाखल करा... 
Step 1 : फॉर्म 16 अपलोड करा.
Step 2 : क्लिअरटॅक्स आपोआप तुमचा आयटीआर तयार करतो.
Step 3: आता तुम्हाला टॅक्ससंबंधीत डिटेल्स व्हेरिफाय करावे लागतील. 
Step 4: पावती क्रमांक मिळविण्यासाठी ई-फाईल टॅक्स रिटर्न मिळेल.
Step 5: आता तुम्हाला नेट बँकिंगच्या माध्यमातून टॅक्स रिटर्नचे ई-व्हेरिफाय करावी लागेल.

MyITreturn :
MyITreturn ही आयकर विभागाकडे नोंदणीकृत वेबसाइट आहे. जी ग्राहकांना विनामूल्य टॅक्स फाइल करण्याची सुविधा देते. ग्राहकाला MyITreturn  वेबसाइटवर आयटीआर फाईल करण्यासाठी काही बेसिक प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. हे प्रश्न करदात्यांचा पगार, घर, गुंतवणूक याविषयांशी संबंधित असतील. या प्रश्नांद्वारे तुमच्या इनकम टॅक्सचे कॅलक्युलेशन केले जाते.

Eztax :
Eztax सुद्धा मोफत टॅक्स रिटर्न फाइल करण्याची सुविधा देते. याबरोबर, कोणीही टॅक्स तयार करण्यासाठी फॉर्म 16 अपलोड करू शकतो. तसेच टॅक्स ऑप्टिमायझर रिपोर्ट मिळवू शकतो आणि विनामूल्य ई-फाईल करू शकतो. याबाबत Eztax च्या वेबसाइटवर पूर्णपणे माहिती आहे.

Quicko :
Quicko ने 100 टक्के विनामूल्य आयटीआर फाईल करण्याचा दावा केला आहे. वेबसाइटवर म्हटले आहे की, पगार आणि उत्पन्न असलेले लोक याद्वारे आयटीआर फायलिंग विनामूल्य करू शकतात.

Read in English

Web Title: now you can file income tax return without any cost via these 4 website check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.