नवी दिल्ली - कोरोनाकाळात संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी रोख रकमेचे व्यवहार करणे मोठ्या प्रमाणात टाळण्यास सुरुवात केली आहे. अनेक जणांकडून डिजिटल ट्रांझॅक्शनला प्राधान्य दिले जात आहे. (Money Transfer From Mobile) मात्र जेव्हा कुटुंबात किंवा मित्र-नातेवाईकांमध्ये मोठ्या रकमेचे व्यवहार करायची वेळ येते तेव्हा या ऑनलाइन व्यवहारांमध्ये समस्या येते. कारण बहुतांश डिजिटल पेमेंट अॅप विशिष्ट्य मर्यादेपर्यंतच कॅश ट्रान्सफर करण्याची सवलत देतात. (Now you can send Rs 1 lakh per day only from mobile number, the service started by these banks including ICICI Bank)
तुम्हालाही ऑनलाइन व्यवहार करताना अशा समस्येचा सामना करावा लागला असेल तर आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता तुम्ही मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना केवळ मोबाइल नंबरच्या माध्यमातून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता.
आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, आणि एअरटेल पेमेंट्स बँक यांनी पे टू कॉन्टॅक्ट किंवा पे युअर कॉन्टॅक्ट ही सेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेंतर्गत तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून कुठस्याही मित्र किंवा नातेवाईकाला त्याच्या मोबाईल नंबरवर पैसे पाठवता येणार आहेत. आतापर्यंत यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी दुसऱ्याचा बँक अकाऊंट डिटेल किंवा यूपीआय आयडी आवश्यक असे. ही सेवा सुरू झाल्यानंतर आता त्याची गरज भासणार नाही.
असे पाठवता येतील पैसे
- सर्वप्रथम तुमच्या बँकेचे अॅप सुरू करा. त्यानंतर पे टू कॉन्टॅक्ट किंवा पे युअर कॉन्टॅक्टवर क्लिक करा
- मोबाईलचे फोनबूक ओपन करा. त्यानंतर ज्या कुणाला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर निवडा
- असे करताच बँकेचे अॅप आपोआप कॉन्टॅक्टचा यूपीआय अॅड्रेस शोधून काढेल. मात्र त्यासाठी सेंडरजवळसुद्धा यूपीआय अॅड्रेस असणे आवश्यक आहे.
- आता अमाऊंट आणि पासवर्ड टाका. त्यानंतर पैसे दुसऱ्या खात्यात जमा होतील.
- बँकांच्या म्हणण्यानुसार यूपीआयच्या नव्या सेवेमुळे पेमेंट्सदरम्यान यूपीआय आयडी किंवा बँक डिटेलची गरज भासणार नाही.
- नव्या सेवेच्या माध्यमातून कोटक महिंद्रा बँक ग्राहकांना ५० हजार रुपयांपर्यंत ट्रान्सफर करण्याची सवलत देणार आहे.
- आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक रोज एक लाख रुपयांपर्यंत ट्रान्सफर करू शकतात.