Join us  

आता ट्विटरवरून कमाई होणार; मस्क यांची भन्नाट योजना, दर महिन्याला पैसे मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 11:42 AM

जगभरातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले ट्विटर (Twitter) टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी खरेदी केले. आता मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.

जगभरातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले ट्विटर (Twitter) टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी खरेदी केले. आता मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. यात पहिल्यांदा त्यांनी ब्लू टिक वापरकर्त्यांना दर महिन्याला पैसे मोजावे लागणार असल्याचा निर्णय घेतला, यामुळे अनेकांनी यावर टीका केली. आता ट्विटर वापरकर्त्यांसाठी इलॉन मस्क यांनी अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरवरुन आपल्याला दर महिन्याला पैसे कमावता येणार आहेत.  

ट्विटर ब्लू टिक वापरकर्त्यांकडून ८ डॉलर म्हणजेच ६६० रुपये दर महिन्याला शुल्क आकारणार असल्याची घोषणा केली. यावर अनेकांनी जोरदार टीका केली. या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर इलॉन मस्क यांनी एकामागून एक ट्विट करत स्पष्टीकरण दिले.आज त्यांनी या संदर्भात एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. 

आज इलॉन मस्क यांनी ट्विट करून ट्विटर ‘एका हाताने द्या, आणि एका हाताने घ्या’ या सूत्राचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले. म्हणजेच आता ब्लू टिक वापरकर्त्यांकडून प्रत्येक महिन्याला पैसे आकारले जाणार आहेत, तर दुसरीकडे त्या वापरकर्त्यांना पैसेही मिळणार आहेत. यात माध्यम चॅनेल, बातम्यांच्या वेबसाइट यांना व्हिडिओंमधून किंवा बातम्यांमधून पैसे मिळवता येणार आहेत. 

ट्विटरवर ब्लू टिक वापरकर्त्यांना रिप्लाय, सर्च, मेन्शन करण्यास प्राधान्य दिले जाईल. याशिवाय ट्विटरवर मोठे व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करता येणार आहेत. तसेच ट्विटरवर मजकूर शेअर करण्याची शब्द मर्यादा वाढवण्यात येणार आहे. तसेच ब्लू टिक वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा कमी जाहिराती दिसणार आहेत.

Elon Musk Twitter : ट्विटरवर ब्लू टिक हवीये? महिन्याला भरा इतके पैसे, मस्क यांची मोठी घोषणा

Twitter सध्या बातम्या प्रकाशीत करणाऱ्या संस्थांना काही धोरणे आणणार आहे. यामुळे माध्यम संस्थांना पैसे मिळवता येणार आहेत. 

Twitter नेत्यांना विशेष टॅग देणार, मस्क यांची घोषणा

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ज्या सेकंडरी टॅगची घोषणा केली, तो टॅग अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना देण्यात आला आहे. बायडन यांच्या नावाखाली United States Government Official असा सेकंडरी टॅग आहे. पण, हा टॅग भारतातील नेत्यांना अजुनही देण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावासमोर असा सेकंडरी टॅग दिसत नाही. पण, आता ट्विटरला ब्लू टिक चार्ज दिल्यानंतर त्यात बदल दिसतील.

एखाद्या देशाशी संबंधित ट्विटर खात्यांना सेकंडरी टॅगद्वारे त्या अकाउंटबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. हे टॅग सरकारचे काही अधिकृत प्रतिनिधी, राज्य-संलग्न मीडिया संस्था आणि त्या संस्थांशी संबंधित व्यक्तींना दिले जाणार आहे. हे लेबल संबंधित ट्विटर (Twitter) खात्याच्या प्रोफाइल पेजवर दिसते. टॅगमध्ये त्या संबंधित खात्याची माहिती मिळणार आहे. 

टॅग्स :ट्विटरएलन रीव्ह मस्कसोशल मीडिया