Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता मिळणार १ ते ३ हजारांत भाड्याने घर

आता मिळणार १ ते ३ हजारांत भाड्याने घर

यूपीए सरकारच्या काळातही ही योजना अस्तित्वात होती. मात्र, आता प्रवासी मजुरांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:06 AM2020-06-22T03:06:54+5:302020-06-22T03:07:06+5:30

यूपीए सरकारच्या काळातही ही योजना अस्तित्वात होती. मात्र, आता प्रवासी मजुरांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे.

Now you will get a house for rent at 1 to 3 thousand | आता मिळणार १ ते ३ हजारांत भाड्याने घर

आता मिळणार १ ते ३ हजारांत भाड्याने घर

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत रेंटल हाऊसिंग स्कीमची घोषणा केली आहे. आता, या योजनेची कॅबिनेट नोट तयार करण्यात आली असून, अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेकडे सोपविण्यात आले आहे. बांधकाम कामगार, कामगार, स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून लवकरच रेंटल हाऊसिंग स्कीमची सुरुवात होऊ शकते. विशेष म्हणजे विद्यार्थी वर्गालाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून १ ते ३ हजार रुपये भाडेतत्वावर विविध वर्गासाठी घर देण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाने या योजनेसाठी सुरुवातीला ७०० कोटींच्या खर्चाचा अंदाज व्यक्त केला आहे. जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूवल मिशन आणि राजीव आवास योजनेतील १ लाख हाऊसिंग युनिट्सचा वापर या योजनेसाठी करण्यात येईल. यूपीए सरकारच्या काळातही ही योजना अस्तित्वात होती. मात्र, आता प्रवासी मजुरांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी १४ मे रोजी या योजनेची घोषणा केली होती.
>पहिल्या टप्प्यात ७५ हजार हाऊसिंग युनिट बनवणार
या योजनेसंबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने द प्रिंटने लिहिले आहे की, बनविण्यात आलेल्या मसुद्यानुसार विविध कॅटेगिरीसाठी १ हजार रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत प्रतिमाह भाडे असणार आहे. या योजनेसाठी कंपन्यांना आपल्या जमिनीसाठी विशेष आर्थिक सहाय्यही देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी तब्बल ७५ हजार हाऊसिंग युनिट बनविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Now you will get a house for rent at 1 to 3 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.